शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापक व उपमुख्याध्यापकांच्या वेतन निश्चितीमध्ये शालेय व्यवस्थापन पदविकेची आडकाठी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 14:12 IST

अकोला: २00४ पासून पदोन्नती मिळाल्यामुळे मुख्याध्यापक व उपमुख्याध्यापक पदावर रुजू झालेल्या शिक्षकांना वेतन निश्चितीकरणासाठी शासनाने शालेय व्यवस्थापन पदविका उत्तीर्ण करण्याची अट घातली.

अकोला: २00४ पासून पदोन्नती मिळाल्यामुळे मुख्याध्यापक व उपमुख्याध्यापक पदावर रुजू झालेल्या शिक्षकांना वेतन निश्चितीकरणासाठी शासनाने शालेय व्यवस्थापन पदविका उत्तीर्ण करण्याची अट घातली असून, ही अट वेतन निश्चितीमध्ये आडकाठी ठरत आहे. लेखाधिकाऱ्यांकडून वेतन निश्चिती करताना, व्यवस्थापन पदविकेची मागणी होत आहे. त्यामुळे ही अट शिथिल करण्याची मागणी शिक्षक महासंघाने सोमवारी अमरावती विभागाचे शिक्षण उपसंचालक अंबादास पेंदोर यांच्याकडे केली आहे.१३ जून २00५ च्या शासन निर्णयानुसार २00४ पासून मुख्याध्यापक व उपमुख्याध्यापक पदावर रुजू झालेल्या शिक्षकांना ५ वर्षात शालेय व्यवस्थापन पदविका उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे. वास्तविक पाहता मुख्याध्यापक व उपमुख्याध्यापकांना या शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रमाची व या आदेशाची माहिती नसल्यामुळे शासनाने दिलेल्या विहित कालावधीमध्ये ते शालेय व्यवस्थापन अध्यापन पदविका उत्तीर्ण करू शकले नाही तर त्यांच्या सातव्या वेतन आयोगाची वेतन निश्चिती करताना अडचणी येत आहेत. अडचणी दूर करण्यासाठी आणि त्यांची वेतन निश्चिती सुकर व्हावी यासाठी शासनाचे मार्गदर्शन मागवून लेखाधिकारी यांनी टाकलेली क्र. ६ ही अट रद्द करावी आणि मुख्याध्यापक व उपमुख्याध्यापकांना भविष्यात शालेय व्यवस्थापन पदविका उत्तीर्ण करण्यासाठी पाच वर्षांची अट शिथिल करावी. मुख्याध्यापक व उपमुख्याध्यापकांची वेतन निश्चिती करताना लेखाधिकाऱ्यांकडून शालेय व्यवस्थापन पदविकेची मागणी करण्यात येत आहे; परंतु शेकडो मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापकांकडे व्यवस्थापन पदविकाच नसल्यामुळे त्यांचे वेतन निश्चित करण्यात आडकाठी निर्माण होत आहे. शिक्षण विभागाने शासनाचे मार्गदर्शन घेऊन तसे हमीपत्रावर पूर्ण करून देण्याच्या अटीवर शिथिल करण्याची किंवा त्याला मुदतवाढ देण्याची मागणी शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी केली आहे. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षक