शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हा दाखल असल्याची माहिती लपवली; विजयी उमेदवाराचे सदस्यत्व रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 20:09 IST

Gram Panchayat Election राखीव जागेवर विजयी झालेल्या उमेदवाराचे सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने मंगळवारी दिला.

खामगाव : ग्रामपंचायतीची निवडणूक लढताना न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणाची माहिती शपथपत्रात न दिल्याने नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव जागेवर विजयी झालेल्या उमेदवाराचे सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने मंगळवारी दिला. जळगाव जामोद तालुक्यातील खांडवी येथील विजयी उमेदवार बळिराम किसन सारोकार यांनी स्वताच दाखल केलेल्या याचिकेवर हा निर्णय झाला आहे. त्यामुळे आता खांडवी येथे त्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे.ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीत खांडवी येथील प्रभाग एकमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव जागा होती. त्या जागेवर बळिराम किसन सारोकार यांनी उमेदवारी दाखल केली. त्यांच्या अर्जावर समिर किसन सारोकार यांनी आक्षेप घेतला. त्यामध्ये बळिराम यांच्याकडे ग्रामपंचायतचा कर थकित आहे. तर भादंविच्या कलम ३०७ नुसार दाखल गुन्ह्याचे प्रकरण खामगाव न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे, असे नमूद केले. सोबतच ही माहिती बळिराम यांनी शपथपत्रात नमूद केली नसल्याचेही स्पष्ट केले. त्यावेळी जळगाव जामोद येथील निवडणूक निर्णय अधिकाऱ््यांनी ३१ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज रद्द केला. या आदेशाला बळिराम सारोकार यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने ४ जानेवारी रोजी अंतरिम आदेश देत याप्रकरणी न्यायालयाच्या निर्णयास अधिन राहून निवडणूक लढण्यास मंजूरी दिली. त्यानंतर निवडणूकीत बळिराम सारोकार यांना २३७ मते मिळून ते विजयी झाले. याप्रकरणाची अंतिम सुनावणी मंगळवारी एकल पिठाच्या न्यायमूर्ती व्ही.एम.देशपांडे यांच्या समोर झाली. त्यामध्ये बळिराम सारोकार यांनी नामनिर्देशन पत्रासोबतच्या शपथ पत्रात गुन्हेगारीविषयक माहिती लपवल्याचे पुढे आले. त्यामुळे त्यांची याचिका ग्राह्य धरता येत नाही, असे सांगत न्यायालयाने त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्वही रद्द करण्याचा आदेश दिला. याप्रकरणी समिर सारोकार यांची बाजू अँड. राम कारोडे यांनी मांडली. तर याचिकाकर्त्याची बाजू अँड.गोपाल मिश्रा तर निवडणूक निर्णय अधिकाऱ््यांच्या वतीने सरकारी वकील श्रीमती बारब्दे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतkhamgaonखामगाव