शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

अनधिकृत संस्थांकडून संगणक, टायपिंग प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 13:41 IST

संस्थांवर वर्षभरापासून कोणतीच कारवाई होत नसल्याचा मुद्दा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चांगलाच गाजला.

अकोला : अनधिकृत, अस्तित्वात नसलेल्या चार संस्थांकडून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना टंकलेखन, संगणकाच्या विविध कोर्सेसचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्या संस्थांवर वर्षभरापासून कोणतीच कारवाई होत नसल्याचा मुद्दा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चांगलाच गाजला. संबंधितांवर कारवाईची मागणी लावून धरत सदस्य राम गव्हाणकर यांनी विविध मुद्दे मांडले. महाराष्ट्र रोजगार हमी योजनेचा आराखडा पुरवणीसह मंजूर करणे, दुधपूर्णा योजनेतील गोंधळ, तर जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांना दर्जोन्नत करण्याच्या ठरावावरून चांगलेच वादंग झाले.जिल्हा परिषद अध्यक्षा प्रतिभा भोजणे, उपाध्यक्ष सावित्री राठोड, बांधकाम व शिक्षण सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी, समाजकल्याण सभापती आकाश सिरसाट, महिला व बालकल्याण सभापती मनीषा बोर्डे, कृषी सभापती पंजाबराव वडाळ, सीईओ सुभाष पवार उपस्थित होते.गौरव कॉम्प्युटर आलेगाव, स्टुडंट कॉम्प्युटर उरळ, संध्या कॉम्प्युटर निमकर्दा, योगेश कॉम्प्युटर कान्हेरी गवळी या प्रशिक्षण केंद्रावर माध्यमिक शिक्षण विभागाने कोणतीही कारवाई केली नसल्याचा मुद्दा सदस्य गव्हाणकर यांनी उपस्थित केला. याबाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी मनुष्यबळ कमी असल्याने विलंब झाला. कारवाई केली जाईल, असे सांगितले.विशेष घटक योजनेच्या दुधाळ जनावरांसाठी निवड झालेल्या लाभार्थीचा ११,९६२ रुपयांचा धनाकर्ष दुसऱ्याच लाभार्थीसाठी वापरण्यात आला. त्यामुळे कान्हेरी गवळी येथील कांताबाई तेलगोटे यांना वंचित ठेवण्यात आले. या प्रकाराची तक्रार केली असता अधिकारी उद्दामपणे बोलत असल्याचा मुद्दाही राम गव्हाणकर यांनी मांडला. गटनेते ज्ञानेश्वर सुलताने यांनी सभागृहातच कारवाई करण्याची मागणी रेटली. त्यावर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एच.आर. मिश्रा यांनी नोटीसचे स्पष्टीकरण येताच कारवाई केली जाईल, असे सांगितले. उपशिक्षणाधिकारी देवेंद्र अवचार यांनी उर्मटपणे बोलल्याच्या चर्चेवरून कारवाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पवार यांनी सांगितले.- ...तर ३१ मार्चलाच खर्च थांबेलवेळेवरच्या विषयामध्ये उकळी बाजार येथील आरोेग्य केंद्र बांधकामाची निविदा प्रक्रियेत निवड झालेले कंत्राटदार सुरेश नाठे यांची ८२ लाख रुपये रकमेची निविदा स्वीकृतीचा विषय पुढील सभेत ठेवण्याचे अध्यक्ष भोजणे यांनी म्हटले. त्यावर सदस्य गजानन पुंडकर यांनी हा ठराव मंजूर न झाल्यास जिल्हा परिषदेचा खर्च ३१ मार्च रोजीच थांबवला जाईल, असा पवित्रा घेतला. सभागृहात काही काळ शांततेनंतर हा ठराव मंजूर करण्यात आला.- काय करायचे ते करा!बांधकाम समितीने ९ कामांचे कार्यादेश थांबवणे योग्य नाही, तसेच समितीला अधिकारही नाही. ते आदेश त्वरित द्यावे, अशी मागणी शिवसेनेचे गटनेते गोपाल दातकर यांनी केली. या मुद्यावरून पांडे गुरुजी यांच्याशी चांगलीच जुंपली. काय करायचे ते करा, असे सभापती म्हणाले. तर हे बोलणे योग्य नाही, असे दातकर म्हणाले. यापुढे जिल्हा नियोजन समितीकडे जाणारी कामेही योग्य पद्धतीने पाठवण्यात यावी, असे सांगत पांडे गुरुजींनी ठरावाला संमती दिली.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद