शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

संगणकातील हार्ड डिस्क करणार जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 01:51 IST

अकोला : शासन मालकीच्या २0 कोटी रुपयांच्या भूखंड  घोटाळा प्रकरणात सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल  केल्यानंतर भूमी अभिलेख विभागातील ज्या संगणकात नोंद  घेण्यात आली आहे, त्या संगणकाची हार्ड डिस्क आर्थिक गुन्हे  शाखा जप्त करणार आहे. त्यानंतर ही डिस्क तपासणीसाठी  हैदराबाद येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे२0 कोटींचा भूखंड घोटाळा हार्ड डिस्कची फॉरेन्सिक लॅबमध्ये होणार तपासणी

सचिन राऊत । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शासन मालकीच्या २0 कोटी रुपयांच्या भूखंड  घोटाळा प्रकरणात सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल  केल्यानंतर भूमी अभिलेख विभागातील ज्या संगणकात नोंद  घेण्यात आली आहे, त्या संगणकाची हार्ड डिस्क आर्थिक गुन्हे  शाखा जप्त करणार आहे. त्यानंतर ही डिस्क तपासणीसाठी  हैदराबाद येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात येणार आहे. अकोला शहरातील शिट नं. ३७ बी प्लॉट नं. १२१/१ व शिट  नं. ३७ बी १२१/१ अ हे संतोषी माता मंदिरानजीकचे भूखंड  शासनाच्या नावे आहेत. या भूखंडातील शिट नं. ३७ बी प्लॉट नं.  १२१/ ‘पैकी’ असा शब्दप्रयोग करून तब्बल २0 कोटी रुपये  किमतीच्या ३ हजार ७१७.१७ चौरस मीटर भूखंडाचे हस्तलि िखत दस्तावेज नसताना तालुका भूमी अभिलेख विभागातील  अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या संगनमताने गजराज गुदडमल  मारवाडी यांच्या नावे संगणकात ऑनलाइन नोंद घेऊन, हा भू खंड कागदोपत्री हडपण्यात आला. हे प्रकरण ‘लोकमत’ने  चव्हाट्यावर आणले, तसेच पाठपुरावा केला. भूमी अभिलेख  विभागाचे उपअधीक्षक योगेश कुळकर्णी यांच्या तक्रारीवरून  सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात भूमी अभिलेख विभागाचे  अधिकारी-कर्मचारी व हा भूखंड हडप करणारा २0 कोटी रु पयांचा लाभार्थी यांच्याविरुद्ध फसवणूक, कट रचण्यासह  विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर तपास  अधिकारी गणेश अणे यांना अधिक अधिकार प्राप्त झाले  असून, त्यांनी तपासाला गती दिली आहे. भूमी अभिलेख  विभागातील सदरचे संगणकातील हार्ड डिस्क जप्त करण्यासाठी  त्यांनी पोलीस अधीक्षकांना पत्र दिले असून, लवकरच ही डिस्क  जप्त करण्यात येणार आहे.

हार्ड डिस्कच्या तीन प्रतीभूमी अभिलेख विभागातील संगणकातील हार्ड डिस्क जप्त  केल्यानंतर त्यामधील आक्षेपार्ह मजकूर व अन्य मजकूर कायम  राहावा म्हणून तीन हार्ड डिस्कमध्ये हा मजकूर कॉपी करण्यात  येणार आहे. त्यानंतर एक प्रत तपास अधिकारी, दुसरी प्रत भूमी  अभिलेख विभाग, तर तिसरी प्रत तपासणीसाठी हैदराबाद येथे  पाठविण्यात येणार आहे.

पाच ते सहा भूखंडांचा घोळभूमी अभिलेख विभागातील कर्मचारी व एका नगरसेविकेचा प ती या दोघांनी पाच ते सहा शासकीय भूखंडांचा घोळ घातल्याची  माहिती आहे. यामधील एका भूखंडाच्या खरेदी-विक्रीचा  व्यवहार पार पडल्याची माहिती असून, सदरचा भूखंड अग्रवाल  नामक व्यापार्‍याला २0 लाखांची खरेदी किंमत दाखवून  विकण्यात आला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा