शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा वेळेतच पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 01:35 IST

तक्रारी ऐकून घ्या, समस्येचे निराकरण तत्काळ होत असेल  तर प्रलंबित ठेवू नका, केवळ प्रशासकीय उत्तरे देऊ नका, आज  आलेल्या तक्रारीची दखल घेऊन किती दिवसात तिचा निपटारा  होईल, ते आताच सांगा अन् दिलेल्या वेळेतच तक्रारींचा निपटारा  झाला पाहिजे, पुढच्या सोमवारी पुन्हा आढावा घेईल, या शब्दात  पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी अधिकार्‍यांना तंबी दिली.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांची अधिकार्‍यांना तंबी लोकशाही सभागृहात  भरला लोकांचा दरबार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : नागरिक तक्रारी करतात, त्यावर कार्यवाही होईल,  याचे आश्‍वासन आपण देतो; पण संबंधित नागरिकांची समस्या  सुटत नसेल, तर  शासनाच्या विषयी लोकांचे चुकीचे मत तयार  होते. तक्रारी ऐकून घ्या, समस्येचे निराकरण तत्काळ होत असेल  तर प्रलंबित ठेवू नका, केवळ प्रशासकीय उत्तरे देऊ नका, आज  आलेल्या तक्रारीची दखल घेऊन किती दिवसात तिचा निपटारा  होईल, ते आताच सांगा अन् दिलेल्या वेळेतच तक्रारींचा निपटारा  झाला पाहिजे, पुढच्या सोमवारी पुन्हा आढावा घेईल, या शब्दात  पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी अधिकार्‍यांना तंबी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात पालकमंत्री   डॉ. रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जनता  दरबाराचे आयोजन  करण्यात आले होते.  या बैठकीला  जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या  समवेत जिल्हा  पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, जिल्हा परिषदेचे मुख्य  कार्यकारी अधिकारी रामामूर्ती, अपर जिल्हाधिकारी  राजेश  खवले, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, जिल्हा  अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकमसह विविध विभागातील  प्रमुख उपस्थित होते.निगरुणा प्रकल्पातील पाणी  सिंचनासाठी शेतकर्‍यांना उपलब्ध  होईल का,  वृद्ध कलावंतांचे मानधान, हिवरखेड येथील रस्ते  तसेच  जॉब कार्डधारकांना  रोहयो अंतर्गत काम, अकोट शहरा तील राहुल नगर येथील पिण्याची पाइपलाइन टाकणे, पाणलोट  विकास पथकाच्या सेवा खंडित केल्याबाबत तसेच गांधीग्राम ये थील घरकुल योजनेचा लाभार्थ्यांना नमुना ड मिळत नाही,  अशा  अनेक तक्रारी ऐकून घेत यावर संबंधित अधिकार्‍यांना दहा  दिवसात कार्यवाहीचे निर्देश पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी  दिले.   यावेळी कला शिक्षकांसह आरोग्य, कृषी, सिंचन, शिक्षण  विभाग, महसूल विभाग, वन विभाग, विद्युत  विभाग, आदी  विभागांतील तक्रारींचे तब्बल ७२ नागरिकांची निवेदने यावेळी   पालकमंत्री डॉ.  पाटील यांना देण्यात आली. या निवेदनांवर  त्वरित  कार्यवाही करून संबंधितांच्या तक्रारीचे निरासरण  करण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी यावेळी दिले.

शालेय पोषण आहाराचे अनुदान प्रलंबित का?शालेय पोषण आहाराचे अनुदान प्रलंबित असल्याबाबत  पालकमंत्र्यांसमोर तक्रार येतातच. जिल्हा परिषदेच्या उपमुख्य  कार्यकारी अधिकारी कुळकर्णी यांना अनुदान प्रलंबित का आहे,  याची विचारणा केली. यासंदर्भात चौकशी करून दोषींना कारणो  दाखवा नोटीस बजावण्याचेही निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. 

प्राथमिक स्तरावर अधिकार्‍याकडून काय कार्यवाही करण्यात  आली, याबाबत विचारणा करण्यात आली. नागरिकांची कामे  करताना  ते काम होईल की नाही,  किती दिवसात होईल, याची   शहानिशा  यावेळी संबंधित अधिकार्‍यांकडून  करण्यात आली,  त्यामुळे आलेल्या प्रत्येक तक्रारीचे निर्धारित वेळेतच निराकरण  होईल, याची नोंद घेतली जाईल. तसेच प्रत्येक तक्रारींचा  आढावा घेतल्या जाणार आहे.-डॉ.रणजित पाटील, पालकमंत्री. 

टॅग्स :Ranjit Deshmukhरणजित देशमुख