शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

मागासवर्गीय वस्त्यांमधील अपूर्ण विकासकामे सात दिवसांत पूर्ण करा; जिल्हा परिषद समाजकल्याण समितीच्या सभेत निर्देश

By संतोष येलकर | Updated: April 20, 2023 18:55 IST

मागासवर्गीय वस्त्यांमधील अपूर्ण विकासकामे सात दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

अकोला : अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या (मागासवर्गीय ) वस्त्यांचा विकास योजनेंतर्गत जिल्हयातील मागासवर्गीय वस्त्यांमधील अपूर्ण विकासकामे येत्या सात दिवसांत पूर्ण करुन, प्रस्तावित नवीन विकासकामांचे नियोजन करण्याचे निर्देश जिल्हा परिषद समाजकल्याण समितीच्या सभेत गुरुवारी देण्यात आले. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे योजनेंतर्गत जिल्हयात सुरु असलेली आणि अपूर्ण असलेल्या विकासकामांचा तालुकानिहाय आढावा या सभेत घेण्यात आला.

 मागासवर्गीय वस्त्यांमधील सुरु असलेली आणि अपूर्ण असलेली विकासकामे सात दिवसांच्या कालावधीत पूर्ण करुन, नवीन कामांचे नियोजन करण्याच्या सूचना या सभेत देण्यात आल्या. जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध याेजनांच्या मुद्दयांवरही सभेत चर्चा करण्यात आली. समाजकल्याण सभापती आम्रपाली खंडारे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या सभेला समितीचे सदस्य तथा सत्तापक्षाचे गटनेता ज्ञानेश्वर सुलताने, राम गव्हाणकर, निता गवइ, माया कावरे, वंदना झळके, लीना शेगोकार, सुनील सरदार यांच्यासह समाजकल्याण अधिकारी ज्ञानबा पुंड व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

कामांच्या ठिकाणी माहिती फलक लावा अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास योजनेंतर्गत जिल्हयात विकासकामे सुरु करताना व कामे पूर्ण झाल्यानंतर कामांच्या ठिकाणी योजनेचे नाव, कामाचे नाव, संबंधित जिल्हा परिषद सदस्याचे नाव, कामाची अंदाजित रक्कम आदी प्रकारच्या माहितीचे फलक लावण्याची सूचना सदस्य राम गव्हाणकर यांनी सभेत मांडली. त्यानुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.

टॅग्स :Akolaअकोला