शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज वाटप पूर्ण करा; अन्यथा शासकीय व्यवहार करणार नाही - जिल्हाधिकाऱ्यांचा बँकांना ‘अल्टीमेटम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 13:33 IST

अकोला : कर्जमाफी योजनेत जिल्ह्यात पात्र ठरलेल्या सर्व शेतकऱ्यांना १८ जूनपर्यंत कोणत्याही परिस्थितीत पीक कर्जाचे वाटप पूर्ण करा, अन्यथा कर्ज वाटपात दुर्लक्ष करणाऱ्या बँकांसोबत यापुढे कोणताही शासकीय व्यवहार करण्यात येणार नाही, असा ‘अल्टीमेटम’ जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी जिल्ह्यातील बँकांना दिला.

ठळक मुद्देजिल्ह्यात आतापर्यंत केवळ १३ हजार शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप योजनेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. शासकीय व्यवहार करण्यात येणार नाही, असा ‘अल्टीमेटम ’ जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जिल्ह्यातील बँकांना दिला.

अकोला : कर्जमाफी योजनेत जिल्ह्यात पात्र ठरलेल्या सर्व शेतकऱ्यांना १८ जूनपर्यंत कोणत्याही परिस्थितीत पीक कर्जाचे वाटप पूर्ण करा, अन्यथा कर्ज वाटपात दुर्लक्ष करणाऱ्या बँकांसोबत यापुढे कोणताही शासकीय व्यवहार करण्यात येणार नाही, असा ‘अल्टीमेटम’ जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी जिल्ह्यातील बँकांना दिला.कर्जमाफी योजनेंतर्गत अकोला जिल्ह्यात १ लाख १५ हजार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. कर्जमाफीसाठी पात्र ठरलेले सर्व शेतकरी यावर्षी पीक कर्ज वाटपासाठी पात्र आहेत. पात्र शेतकºयांना नवीन पीक कर्ज वाटप करणे गरजेचे आहे; मात्र जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १३ हजार शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. त्यानुषंगाने पीक कर्ज वाटप योजनेच्या अंमलबजावणीकडे यावर्षी जिल्ह्यातील बँका हेतुपुरस्सर दुर्लक्ष करून, पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप योजनेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कर्जमाफी योजनेत पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना १८ जूनपर्यंत कोणत्याही परिस्थितीत पीक कर्ज वाटपाची कार्यवाही पूर्ण करण्यात यावी, अन्यथा या कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या बँकांसोबत यापुढे कोणताही शासकीय व्यवहार करण्यात येणार नाही, असा ‘अल्टीमेटम ’ जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जिल्ह्यातील बँकांना दिला.बँकांच्या अकार्यक्षमकार्यपद्धतीवर खेद !जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १३ हजार शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले. बँकांच्या अशा अकार्यक्षम कार्यपद्धतीमुळे शेतकऱ्यांमध्ये शासनाची प्रतिमा मलीन होत आहे, ही खेदाची बाब असल्याचेही जिल्हाधिकाºयांनी बँकांना दिलेल्या आदेशात म्हटले आहे.कर्जमाफी योजनेत पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील सर्व शेतकºयांना पीक कर्ज वाटपाचे काम १८ जूनपर्यंत पूर्ण करण्यात यावे, अन्यथा या कामात दुर्लक्ष करणाऱ्यां  बँकांसोबत यापुढे कोणताही शासकीय व्यवहार करण्यात येणार नाही, असा अल्टीमेटम जिल्ह्यातील बँकांना दिला आहे.-आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हाधिकारी.

 

टॅग्स :AkolaअकोलाAastik Kumar Pandeyआस्तिककुमार पांडेय