शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्ती परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड होत नसल्याच्या तक्रारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 16:40 IST

विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र कसे द्यावेत, असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.

अकोला : इयत्ता पाचवी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती व इयत्ता आठवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा १६ फेब्रुवारी होणार आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेने विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून दिले आहेत; परंतु शाळांच्या लॉगीनमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड होतच नसल्याच्या शिक्षकांकडून करण्यात येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र कसे द्यावेत, असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा १६ फेब्रुवारी रोजी सर्वच जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. अकोला जिल्ह्यातून दोन्ही परीक्षा जवळपास १२ हजारावर विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. या परीक्षेसंबंधीची अधिसूचना परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये परीक्षा परिषदेने उपलब्ध करून दिले असले तरी या लॉगीनमध्ये शिष्यवृत्तीचे प्रवेशपत्र डाउनलोड होत नसल्याचे समोर आले. अनेक शाळांनी लॉगीनमध्ये सातत्याने प्रयत्न करूनही विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड होत नाहीत. त्यामुळे शाळेसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. परीक्षा तोंडावर असताना, परीक्षेचे प्रवेशपत्र मिळाले नाही तर विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागणार तर नाही ना. अशी भीती शिक्षक, पालक व्यक्त करीत आहेत. परीक्षा परिषदेच्या दोन्ही संकेतस्थळावर तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने, विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्रे डाउनलोड करण्यात अडचणी येत आहेत. यावर परीक्षा परिषदेने तातडीने तोडगा काढावा आणि विद्यार्थ्यांना सहज प्रवेशपत्र उपलब्ध होतील, यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी पालक व शिक्षकांनी केली आहे.

विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र उपलब्ध होण्यासाठी परीक्षा परिषदेशी संपर्क साधण्यात येईल. संकेतस्थळावर तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे शाळांच्या लॉगीनवर प्रवेशपत्र डाउनलोड होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.- प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी, माध्यमिक

 

टॅग्स :AkolaअकोलाScholarshipशिष्यवृत्तीEducation Sectorशिक्षण क्षेत्र