शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
5
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
6
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
7
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
8
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
9
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
10
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
11
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
12
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
13
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
14
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
15
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
16
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
17
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
18
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
19
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
20
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका

महावितरण कार्यालयात तक्रार पेट्या लावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 14:15 IST

अकोला: महावितरणच्या प्रत्येक अधिकारी व कर्मचाºयांनी वीज ग्राहकांना नियमित वेळ देऊन त्यांच्या तक्रारी, सूचना जाणून घ्याव्यात, ग्राहकांसाठी आपण सहजपणे उपलब्ध झाल्यास ग्राहकही थेट आपल्याकडे येईल, कुणा मध्यस्थामार्फत येणार नाहीत यासाठी महावितरणच्या प्रत्येक कार्यालयांमध्ये तक्रार पेट्यांची सुविधा निर्माण करा. मुळात मध्यस्थांमुळेच अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यांना प्रतिबंध घालण्यासाठी ग्राहकांसाठी पुरेसा ...

अकोला: महावितरणच्या प्रत्येक अधिकारी व कर्मचाºयांनी वीज ग्राहकांना नियमित वेळ देऊन त्यांच्या तक्रारी, सूचना जाणून घ्याव्यात, ग्राहकांसाठी आपण सहजपणे उपलब्ध झाल्यास ग्राहकही थेट आपल्याकडे येईल, कुणा मध्यस्थामार्फत येणार नाहीत यासाठी महावितरणच्या प्रत्येक कार्यालयांमध्ये तक्रार पेट्यांची सुविधा निर्माण करा. मुळात मध्यस्थांमुळेच अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यांना प्रतिबंध घालण्यासाठी ग्राहकांसाठी पुरेसा वेळ राखून ठेवा, असे निर्देश नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी दिले. अकोला येथे महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाºयांच्या आढावा बैठकीला संबोधित करताना त्यांनी हे आवाहन केले.महावितरण ही देशातील सर्वाधिक व्याप्ती असलेली वीज वितरण कंपनी आहे, येथील कर्मचाºयांचा पगारही इतरांच्या तुलनेत भरीव आणि आकर्षक असताना केवळ थोड्या लालसेपोटी कंपनीची जनमानसातील प्रतिमा मलीन होते. त्यामुळे अशा प्रकारच्या गैरकृत्यापासून सदैव लांबच राहा. महावितरणमधील बहुतांश कर्मचारी चांगले काम करीत आहेत; मात्र केवळ चांगले काम करून भागत नाही तर आपला एखादा सहकारी गैरकृत्य करीत असेल तर त्याला अटकाव करण्याचीही गरज आहे. तुमच्या प्रतिबंधाला तो जुमानत नसेल तर वरिष्ठांना त्याची कामे निदर्शनास आणून देण्याच्या सूचनाही खंडाईत यांनी केल्या.तक्रारीसाठी दूरध्वनी क्रमांकग्राहकांना त्यांची तक्रार नोंदविण्यासाठी महावितरणच्या अकोला परिमंडलांतर्गत ७८७५७६३३५० हा दूरध्वनी क्रमांक उपल्ब्ध करून देण्यात आला असून, त्यावर आलेल्या तक्रारींची दखल स्वत: मुख्य अभियंता घेणार आहेत. याशिवाय महावितरणच्या मुंबई येथील मुख्यालयानेही यासाठी हेल्पलाइन सुरू केली असून, तेथील ०२२-२६४७८९८९ किंवा ०२२-२६४७८८९९ या क्रमांकावर ग्राहक त्यांची तक्रार नोंदवू शकतात. दूरध्वनीवर बोलतानाही ग्राहक दुखाविला जाणार नाही, याची योग्य काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.औद्योगिक संघटनेसोबत चर्चाअकोला शहरातील उद्योजकांच्या तक्रारी आणि सूचना ऐकण्यासाठी महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी इंडस्ट्रियल असोसिएशच्या पदाधिकाºयांसोबत चर्चा केली. यावेळी शक्य तेवढ्या तक्रारींची त्वरित सोडवणूक करण्यात येऊन उर्वरित तक्रारींच्या सोडवणुकीसाठी त्वरित उपाययोजना करण्याच्या सूचना प्रादेशिक संचालकांनी दिल्या.