शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘बीटी’च्या सहा कंपन्यांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 02:34 IST

जिल्ह्यात बीटी कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे यासंदर्भात आक्रमक भूमिका घेतलेल्या शिवसेना पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी बुधवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या देत, दोषी बियाणे कंपन्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.

ठळक मुद्देशिवसेना आक्रमक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात दिला ठिय्या

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात बीटी कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे यासंदर्भात आक्रमक भूमिका घेतलेल्या शिवसेना पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी बुधवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या देत, दोषी बियाणे कंपन्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. त्यानुषंगाने कृषी विभागाच्या जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक मिलिंद जंजाळ यांनी बीटी कपाशीच्या सहा बियाणे कंपन्यांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात पेरणी केलेल्या बीटी कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने बीटी कपाशी पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे बीटी कपाशी उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे यासंदर्भात दोषी संबंधित बीटी कपाशी बियाणे कंपन्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी करीत शिवसेना पदाधिकार्‍यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या दिला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम कार्यालयात उपस्थित नसल्याने, शिवसैनिकांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक मिलिंद जंजाळ यांच्याकडे मागणी रेटून धरली. जोपर्यंत दोषी बीटी कपाशी बियाणे कंपन्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात येणार नाही, तोपर्यंत आम्ही कार्यालय सोडणार नाही, अशी आक्रमक भूमिका शिवसैनिकांनी घेतली. त्यामुळे बीटी कपाशी बियाणे उत्पादक सहा कंपन्यांविरुद्ध जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक मिलिंद दिनकर जंजाळ यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात छेडण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात  निवासी उपजिल्हाप्रमुख गोपाल दातकर, अकोला शहरप्रमुख (पूर्व ) अतुल पवनीकर, शहरप्रमुख (पश्‍चिम) राजेश मिश्रा, प्रदीप गुरुखुद्दे, तालुकाप्रमुख विकास पागृत, नगरसेवक मंगेश काळे, गजानन चव्हाण, शशी चोपडे, दिनेश सरोदे, उप शहरप्रमुख अभिषेक खरसाडे, किरण अवताडे, केदार खरे, सुनील दुर्गीया, लक्ष्मण पंजाबी, अविनाश मोरे, योगेश गीते, नकुल ताथोड, उमेश गावंडे, विनायक गावंडे, सुभाष नागे, नंदू चव्हाण, संतोष नांदूरकर, दहीगाव (अवताडे) येथील शेतकरी पुरुषोत्तम अवताडे, नीलेश जुंबळे, विठ्ठल पवार, योगेश अवताडे, योगेश जुंबळे, विठ्ठल अवताडे, सिद्धार्थ पहुरकर, दिलीप सावळे, अश्‍विन नवले यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

१0९८ तक्रारी; २१६ तक्रारींचा अहवाल शेतकर्‍यांची फसवणूक, कृषी विभागाची तक्रारबीटी कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे. यासंदर्भात तालुका स्तरावर  १ हजार ९८ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी २१६ तक्रारींच्या अहवालानुसार जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीने मूर्तिजापूर व तेल्हारा तालुक्यात कपाशी पिकाची पाहणी केली असता, गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकर्‍यांचे  नुकसान झाल्याचे दिसून येते. बीटी कपाशी बीजी-२ उत्पादक कंपन्यांनी संबंधित बियाणे अधिकृत विक्रेत्यांमार्फत शेतकर्‍यांना विक्री करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची फसवणूक करण्यात आली असल्याने  महाराष्ट्र कापूस बी-बियाणे अधिनियम २00९ चे उल्लंघन झाले आहे. त्यानुषंगाने  संबंधित सहा बियाणे कंपन्यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक मिलिंद जंजाळ यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात केली आहे.

टॅग्स :Akola cityअकोला शहरAkola MIDCअकोला औद्योगिक विकास महामंडळ