पातूर: केळीची रोपे सदोष निघाली असून, याप्रकरणी फसवणूक झाल्याची तक्रार पातूर तालुक्यातील नांदखेड येथील शेतकरी अनंतराव शेषराव इंगळे व बाबूराव इंगळे यांनी तीन कंपन्यांविरोधात मंगळवारी पातूर पोलीस ठाण्यात दाखल केली. इंगळे यांनी एचएचबीटी योजनेंतर्गत फळबाग लागवडीकरिता युनियन बॅँकेकडून १0 लाख ४९ हजार रुपयांचे कर्ज घेतले. त्यांनी केळी, लिंबू, सीताफळ व मोसंबीची लागवड करण्याचा निर्णय घेतला. केळी लावडीसाठी त्यांनी रमेश आकोटकर यांच्या इंद्रायणी अँग्रोटेककडे ह्यजी ९ह्ण जातीच्या ५५00 केळी रोपांचे १४ रुपये प्रतिरोप या दराने बुकिंग केले. रोपे देताना ह्यइंद्रायणी अँग्रोटेक, पणजह्ण या नावाचे बिल न देता ह्यमाउली हायटेक नर्सरी, सेलू ता. खेड, जि. पुणेह्ण या नावाने इंगळे यांना देयक मिळाले होते. केळी रोपांची वाढ पुरेशा प्रमाणात न झाल्यामुळे आपली फसवणुक झाल्याचे शेतकर्यांच्या लक्षात आले आहे.
शेतक-यांची कंपन्यांविरुद्ध पोलिसात तक्रार
By admin | Updated: March 10, 2016 02:14 IST