शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभागाची पोलिसांत तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2016 02:19 IST

बोर्डी येथील वांझोटी केळी रोपे प्रकरण; आंबोडा येथील गुन्ह्यात होणार समावेश.

आकोट: बोगस व निकृष्ट दर्जाच्या केळी रोपांचा पुरवठा केल्यामुळे आकोट तालुक्यातील बोर्डी येथील केळी उत्पादक शेतकर्‍यांचे एकूण ४४ लाख ४४ हजार ३७३ रुपयांचे नुकसान झाल्याने याप्रकरणी कायदेशीर कारवाईसाठी उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाने सोमवारी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यापूर्वी आंबोडा येथील केळी उत्पादक शेतकर्‍यांची २४ लाख रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. बोर्डी येथील तक्रारही आंबोडा येथील गुन्हय़ात समाविष्ट करण्यात यावी, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. बोर्डी येथील शेतकर्‍यांनी रमेश रामचंद्र आकोटकरकडे इंद्रायणी कंपनीच्या रोपांची मागणी नोंदविली होती. यासाठी शेतकर्‍यांनी अग्रीम रकमेचाही भरणा केला; मात्र त्यांना पुसद येथील वसंत बायोटेकची पावती देण्यात आली. त्यामुळे शेतकर्‍यांनी आकोटकरला जाब विचारला. ह्यइंद्रायणी कंपनीचे कंद वसंत बायोटेक व खेड येथील माउली हायटेक नर्सरीकडे प्रोसेसिंगसाठी पाठविले असल्याने पावती वसंत बायोटेक किंवा माउलीच्या नावे द्यावी लागते. रोपे ही इंद्रायणी कंपनीचीच देण्यात येतील,ह्ण असे शेतकर्‍यांना सांगण्यात आले; मात्र निकृष्ट दर्जाची रोपे देऊन फसवणूक केल्याचे समोर आले असून, याबाबत कारवाई करण्याची मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे. त्यांनी आता जी-९ या जातीच्या वाणाची लागवड केली होती. केळीची वाढ खुंटली!केळीच्या पिकावर रोपे खरेदी, ड्रिंचिंग, फवारणी, खत, मजुरी व इतर मशागतीवर शेतकर्‍यांनी भरपूर खर्च केला; मात्र केळीच्या झाडांना केवळ चार ते पाच फण्यांचे घड लागले. सदर बाबसुद्धा त्यांनी रमेश आकोटकरांना कळविली होती; मात्र त्यांनी वातावरणाच्या दोषामुळे केळीच्या झाडांवर परिणाम होत असल्याचे आम्हाला सांगितले होते. शेतकर्‍यांनी बोर्डी येथील दुसर्‍या कंपनीकडून घेतलेल्या केळीच्या रोपांची वाढ, बाग उत्तम असल्याचे सांगितले. या दुसर्‍या कंपनीने दिलेल्या रोपांवर वातावरणाचा परिणाम का झाला नाही, असा सवाल शेतकर्‍यांनी उपस्थित केला. यावर आकोटकरांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.