शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या दडपशाहीविरोधात आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

By admin | Updated: August 30, 2016 02:02 IST

हिंदूंच्या सणांच्या बाबतीत न्यायालयाच्या नावावर अकोला पोलिसांनी प्रचंड दडपशाही सुरू असल्याचा आरोप.

अकोला, दि. २९: शिवाजी पार्क परिसरात पोलिसांनी केलेल्या दडपशाहीमुळे येथील एका व्यावसायिकाचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याचा आरोप करीत पोलिसांच्या या दडपशाहीची आ. गोवर्धन शर्मा आणि आ. रणधीर सावकर यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. या दोन्ही आमदारांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पोलिसांचा हिंदूंच्या धार्मिक सण-उत्सवामध्ये अतिरेक वाढतच असल्याचीही माहिती यावेळी या आमदारांनी मुख्यमंत्र्यांना दिली. हिंदूंच्या सणांच्या बाबतीत न्यायालयाच्या नावावर अकोला पोलिसांनी प्रचंड दडपशाही सुरू केली आहे. शहरामध्ये दहशत निर्माण करण्याचे काम पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले असून हा प्रकार तत्काळ रोखण्यात यावा, अशी मागणीही शर्मा आणि सावरकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे सोमवारी केली. राजराजेश्‍वराचा पालखी कावड यात्रा महोत्सव शांततेत सुरू असताना आणि कोणतेही कारण नसताना बाजारपेठेतील दुकाने बंद करण्यास पोलीस प्रशासनाने भाग पाडले. पोलिसांनी दुकाने बंद करण्यासाठी केलेल्या अतिरेकी कारवाईमुळे शिवाजी पार्क येथील व्यावसायिक प्रकाश अंबादास येळमे (६१) यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाल्याचेही आ. गोवर्धन शर्मा व आ. रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्री यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना सांगितले. गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस प्रशासनाकडून हा प्रकार सुरू असून सरकारविषयी जनतेमध्ये असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न अकोला पोलीस करीत असल्याचा आरोपही या दोन आमदारांनी मुख्यमंत्री यांना दिलेल्या तक्रारीत केला आहे. येणार्‍या काळात गणपती तसेच नवरात्रामध्येसुद्धा असा प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलीस प्रशासन सरकारविरुद्ध अशा प्रकारचे कृत्य करून जनभावना भडकविण्याचा प्रयत्न करीत असून यावर मुख्यमंत्र्यांनी त्वरित कारवाई करण्याची गरज असल्याचेही या दोन आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे स्पष्ट केले.न्यायालयात निर्दोष सुटलेले तडीपार शहरातील काही युवकांना तडीपार करण्यात आले आहे. ज्या युवकांनी दीड ते दोन वर्ष कारागृहात काढल्यानंतर ते निर्दोष सुटले अशा युवकांना वेठीस धरण्यासाठी त्यांना तब्बल दोन वर्षांंसाठी जिल्हय़ातून तडीपार करण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आले. पोलीस प्रशासनाने न्यायालयाच्या नावाखाली हिंदू धर्मीयांना वेठीस धरण्याचा सपाटाच लावला असून यावर तातडीने अंकुश मिळविण्याचे प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी करावे, असेही आ. शर्मा व सावरकर यांनी निवेदनात स्पष्ट केले.