शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

दुबार पेरणीच्या खर्चासह हवी नुकसान भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 15:35 IST

दुबार पेरणीच्या खर्चासह नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकºयांकडून करण्यात येत आहे.

- संतोष येलकर  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यातील विविध भागात पेरणीनंतर सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याने, शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. सोयाबीन उगवले नसलेल्या शेतकऱ्यांना बियाणे बदलून देण्याचे संबंधित बियाणे कंपन्यांकडून प्रस्तावित असले तरी, बियाणे उगवले नसल्याने पहिल्या व दुसºया पेरणीवर झालेला खर्च लक्षात घेता, दुबार पेरणीच्या खर्चासह नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकºयांकडून करण्यात येत आहे.राज्यातील विविध भागात पेरणीनंतर सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी शेतकºयांकडून मोठ्या प्रमाणात कृषी विभागाकडे करण्यात येत आहेत. या पृष्ठभूमीवर सोयाबीन उगवले नसलेल्या शेतांमधील पंचानामे करण्याचे काम कृषी विभागामार्फत तालुकास्तरीय बियाणे तक्रार निवारण समित्यांकडून करण्यात येत आहेत. सोयाबीन बियाणे उगवले नसल्याने, शेतकºयांना दुबार पेरणी संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यानुषंगाने बियाणे उगवले नसलेल्या शेतकºयांना बियाणे बदलून देण्याची कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश शासनाच्या कृषी विभागामार्फत ‘महाबीज’ला देण्यात आले. त्यानुसार सोयाबीन बियाणे उगवले नसलेल्या शेतकºयांना बियाणे बदलून देण्याची उपाययोजना महाबीज आणि इतर खासगी बियाणे कंपन्यांकडून प्रस्तावित आहे. केवळ बियाणे बदलून मिळाल्यास, शेतकºयांना एकरी २ हजार ५०० रुपयांपर्यंत नुकसान भरपाई मिळू शकते; परंतु सोयाबीन बियाणे उगवले नसल्याने, शेतकºयांनी पेरणीसाठी केलेला एकरी ४ हजार ५०० रुपयांचा खर्च पाण्यात गेला असून, दुबार पेरणीसाठीही खर्च करावा लागत आहे. त्यानुषंगाने सोयाबीनच्या पहिल्या व दुसºया पेरणीसाठी शेतकºयांचा झालेला एकरी ९ हजार रुपयांचा खर्च विचारात घेऊन, दुबार पेरणीच्या खर्चासह नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकºयांकडून केली जात आहे.सोयाबीन पेरणीचा असा आहे एकरी खर्च!सोयाबीन पेरणीसाठी एकरी ४ हजार ५०० रुपये एवढा खर्च आहे. त्यामध्ये सोयाबीन बियाणे २ हजार ५०० रुपये, रासानिक खत १ हजार २०० रुपये, ट्रॅक्टरद्वारे पेरणी ५०० रुपये आणि मजुरी ३०० रुपये इत्यादी खर्चाचा समावेश आहे.सोयाबीन बियाणे उगवले नसल्याने दुबार पेरणी करावी लागत आहे. त्यामुळे पहिल्या आणि दुसºया पेरणीसाठी शेतकºयांना एकरी ९ हजार रुपये खर्च करावा लागत आहे. दुबार पेरणीपर्यंत शेतकºयांचा झालेला खर्च लक्षात घेता, शेतकºयांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे.- शिवाजीराव भरणेशेतकरी, रामगाव, ता. अकोला.

सोयाबीन बियाणे उगवले नसलेल्या शेतकºयांना केवळ बियाणे बदलून न देता, बियाणे उगवले नसल्याने दुबार पेरणीसाठी करावा लागलेला खर्च विचारात घेऊन शेतकºयांना नुकसान भरपाई दिली पाहिजे.- विजय चतरकरशेतकरी, कापशी, ता. अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी