अकोला : उत्पादक ते ग्राहक या साखळीमधील मध्यस्थांची संख्या कमी करू न शेतकर्यांना त्यांच्या मालाचा योग्य दाम मिळावा, यासाठी शहरी भागाला भाजीपाला पुरवठा करण्यात येणार आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत हा प्रकल्प राबविण्यात येणार असून, शेतकरी उत्पादक गट तथा समुहाकडील भाजीपाला स्थायी व फिरत्या विक्री केंद्रामार्फत ग्राहकांपर्यत पोहोचविला जाईल. यासाठी शेतकरी उत्पादक गटानां अनुदानही दिले जाणार आहे.शासनाने राज्यात उत्पादक ते थेट ग्राहक भाजीपाला, धान्य व्रिकी योजना राबविली आहे; परंतु र्मयादित स्वरूपाच्या या योजनेला व्यापक स्वरू प देण्यासाठी केंद्र शासनाने या प्रकल्पाकडे लक्ष केंद्रीत केले आहे. शेतकर्यांना त्यांनी उत्पादीत केलेल्या मालाला योग्य भाव मिळावा, हा उद्देश यामागे असला तरी ग्राहकांना वाजवी दरामध्ये उच्च प्रतिचा व ताजा भाजीपाला उपलब्ध करू न देण्याची व्यवस्था करणे; हादेखील या प्रकल्पामागचा मुख्य उद्देश आहे.या प्रकल्पातंर्गत उत्पादक शेतकरी गट, शेतकरी उत्पादक समूह किंवा या गटांनी पुरू स्कृत केलेला लघू विक्री व्यावसायिक, अँग्रीकेटर्स म्हणून मान्यतप्राप्त व्यक्ती किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या फ्रेंचायजी, उद्योजक व्यक्ती, सहकारी संस्था, स्वंयसहायता गट, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील नोंदणीकृत कंपन्यांना अनुदान दिले जाणार आहे. या सर्व विक्रेत्यांना शहरी भागासाठी या प्रकल्पातंर्गत भाजीपाला विक्री करता येईल. या प्रकल्पातंर्गत स्थायी व फिरत्या विक्री केंद्राला खर्चाच्या ५0 टक्के किंवा कमाल पंधरा हजार रूपये इतके अनुदान दिले जाणार आहे. स्वत:च्या जागेत स्थायी विक्री केंद्र बांधायचे असेल, तर त्यांना शितगृहाच्या सुविधेसह चार लाखाचे अनुदान दिले जाईल. भाड्याच्या जागेत हे विक्री केंद्र उभारायचे असल्यास त्यांना दोन लाखापर्यंत अनुदान देय असून, (मेटोराईज्ड व्हेंडीग कार्ट) फिरते वाहन विक्रीसाठी दोन लाखाचे अनुदान दिले जाणार आहे. यातील काही प्रकल्पांसाठी दहा लाखापर्यत अनुदान मिळणार आहे. यासाठी शेतकरी उत्पादक गट, शेतकरी उत्पादक समुहाला यासाठीचे अर्ज उपलब्ध करू न देण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे शेतकर्यांना आपला उत्पादीत माल मोठे हॉटेल्स, बाजार व इतर ठिकाणी थेट विकता येणार आहे.
शेतमाल थेट बाजारात विकणार !
By admin | Updated: September 28, 2014 01:54 IST