शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्त १९ दिवसांपासून मनपात फिरकलेच नाहीत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 10:47 IST

Akola Municipal Corporation मनपात उपस्थित न राहता निवासस्थानातून महत्त्वाच्या फायलींचा निपटारा सुरू केला आहे.

ठळक मुद्देमनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी मनपाकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.सर्व दाराेमदार प्रभारी उपायुक्त वैभव आवारे यांच्या खांद्यावर आली आहे.

अकाेला : महापालिका आयुक्त संजय कापडणीस मागील १९ दिवसांपासून मनपात फिरकले नसल्यामुळे प्रशासकीय कारभार वाऱ्यावर असल्याचे चित्र समाेर आले आहे. आयुक्तांना बदलीचे वेध लागल्यामुळे की काय, त्यांनी मनपात उपस्थित न राहता निवासस्थानातून महत्त्वाच्या फायलींचा निपटारा सुरू केला आहे. आयुक्तांच्या अनुपस्थितीचा गैरफायदा घेत अनेक विभाग प्रमुख व कर्मचारी कर्तव्याला दांडी मारत असल्यामुळे सर्वसामान्य अकाेलेकरांची कामे रखडली आहेत.

मागील तीन वर्षांच्या कालावधीत महापालिकेच्या विविध विभागांतील घाेटाळे चव्हाट्यावर आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने सिमेंट रस्त्यांचा समावेश असून, अवघ्या सहा महिन्यांतच शहरातील सिमेंट रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. याप्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी आस्तीककुमार पांडेय यांच्याकडे सादर झालेल्या साेशल ऑडिटच्या अहवालात सहा सिमेंट रस्त्यांची कामे अतिशय निकृष्ट व दर्जाहिन असल्याचे नमूद करण्यात आले हाेते. अहवालानुसार संबंधित ठेकेदार, बांधकाम विभागातील अभियंत्यांच्या विराेधात कारवाई करण्याचे निर्देश आस्तीककुमार पांडेय यांनी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांना दिले हाेते. आयुक्त कापडणीस यांनी कारवाई न करता सखाेल चाैकशी व तपासणीसाठी नागपूर येथील ‘व्हीएनआयटी’ची नियुक्ती केली. मागील दाेन वर्षांपासून अद्यापही या प्रकरणी आयुक्तांनी कारवाईसाठी हालचाली केल्या नसल्याचे समाेर आले आहे. ‘स्वच्छ भारत’अभियानअंतर्गत कागदाेपत्री बांधण्यात आलेल्या शाैचालयांप्रकरणी प्रशासनाने २९ काेटींची देयके अदा केली आहेत. याप्रकरणी उपायुक्त वैभव आवारे यांना चाैकशी करण्याचे निर्देश आयुक्त कापडणीस यांनी २०१९ मध्ये दिले हाेते. अद्यापही याप्रकरणी कारवाई झाली नाही, हे विशेष. यांसह सायकल खरेदी घाेळ, विद्यार्थिनींना हायजिन किट वाटप प्रकरणात चाैकशी अहवाल प्राप्त झाल्यावरही आयुक्तांनी दाेषींवर कारवाई केली नाही.

बदलीचे वेध लागताच मनपाकडे पाठ

मनपातील नियमबाह्य कामकाज व विविध घाेटाळ्यांत आयुक्त संजय कापडणीस कारवाई करीत नसल्याचे पाहून शिवसेनेने राज्य शासनाकडे तक्रार केली आहे. प्राप्त तक्रारीची शासनाने गंभीर दखल घेत आयुक्तांच्या उचलबांगडीचे संकेत दिले आहेत. बदली हाेण्याचे वेध लागताच आयुक्तांनी मनपाकडे पाठ फिरवल्याचे समाेर आले आहे.

उपायुक्तांवर दाराेमदार

मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी मनपाकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रशासकीय कारभाराची सर्व दाराेमदार प्रभारी उपायुक्त वैभव आवारे यांच्या खांद्यावर आली आहे. दैनंदिन कामकाज निकाली काढताना आवारे यांची कसरत हाेत असली तरी ते नेटाने जबाबदारी पार पाडत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाAkolaअकोला