शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ४२ अधिकाऱ्यांसह २३८ पोलिसांनी राबविले कोम्बिंग ऑपरेशन

By सचिन राऊत | Updated: March 3, 2024 20:09 IST

५८७ वाहनांची तपासणी करीत ९५ वाहन चालकांवर कारवाई.

अकोला : जिल्हयात वाढत्या मालमत्तेच्या गुन्हयांना आळा घालण्यासाठी पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनात जिल्हयात ३ मार्चच्या रात्री अचानक नाकाबंदी करण्यात आली. त्यानंतर कोंबीग ऑपरेशन राबविण्यात आले. यामध्ये ४२ पाेलिस अधिकाऱ्यांसह २३८ पाेलिस अंमलदारांनी सहभागी हाेत रात्रभर कारवाइचा सपाटा लावला. या दरम्यान ५८७ वाहणांची तपासणी करीत ९५ वाहन चालकांवर दंडात्मक कारवइ करण्यात आली.

जिल्हयात वाढलेल्या चाेरीच्या घटना राेखण्यासाठी पाेलिसांनी कंबर कसली असून पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या संकल्पनेत अपर पोलीस अधीक्षक अभय डाेंगरे, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस निरीक्षक शहर वाहतुक शाखा, सर्व ठाणे प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी यांनी काेम्बींग ऑपरेशनमध्ये सहभाग घेवुन कारवाई केली. नाकाबंदी दरम्यान रिफलेक्टर जॅकेट व टॉर्च घेवुन नाकाबंदीत बॅरीकेटींग करून तपासलेले प्रत्येक वाहनाचा क्रंमाक व चालकाचे नाव, पत्ता व मोबाईल क्रंमाक घेवुन दुचाकी ३०६ व चारचाकी २८१ अशा प्रकारे एकुण ५८७ वाहने चेक करून त्यापैकी ९५ वाहन चालकांवर मोटार वाहन कायदयान्वये कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ३८ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ६५ निगराणी बदमाश व ४२ माहितीगार गुन्हेगार चेक करण्यात आले. कलम १२२ महाराष्ट्र पोलीस कायदा याप्रमाणे ९ कारवाई, कलम १४२ प्रमाणे ०१ कारवाई, भारतीय हत्यार कायदयान्वये ०१ कारवाई करण्यात आली. कलम ३३ आर डब्लयु प्रमाणे ०२ कारवाइ, कलम ११०,११७ प्रमाणे एकुण २६ कारवाया करण्यात आल्या. ० जिल्हयातील ६६ हाॉटेलची तपासणी

कोम्बींग ऑपरेशन दरम्यान जिल्हयातील ६६ हॉटेल लॉजेस व ९५ एटीएमची तपासणी करण्यात आली. नाकाबंदी दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी, अंमलदार यांनी सहभाग घेवुन कारवाइ केली. यासोबतच एका तडीपार इसमास अटक केली असून सतत अशा प्रकारचे कोम्बींग ऑपरेशन व नाकाबंदी जिल्हयात सुरुच राहणार असल्याचे पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Akolaअकोला