अकोला : जिल्हास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत १९ वर्षाआतील मुलांच्या गटात श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या व्हॉलीबॉल संघाने विजय मिळविला. विजयी संघ ८ ऑक्टोबर रोजी अकोल्यात होणार्या अमरावती विभागीय स्तर स्पर्धेत अकोला महानगरपालिकेचे प्रतिनिधित्व करणार आहे. विजयी संघात प्रशांत डोंगरे, शुभम खरात, विशाल सिरसाट, पुनीत चव्हाण, मोहित खरात, योगेश दुबे, वृषभ कावळे, अजय धार्मिक, यश मेश्राम, मोहित कश्यप, प्रणय तालोट यांचा समावेश आहे. प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे, प्रा.उदय देशमुख, प्रा. प्रमोद बोर्डे, विभागप्रमुख प्रा. संजय काळे, प्रा.डॉ. सूर्यकांत कवडे, प्रा. पुरुषोत्तम बावणे, प्रशिक्षक हातवळणे, प्रशिक्षक हरणे यांनी खेळाडूंचे कौतुक केले.
महाविद्यालय वार्ता : श्री शिवाजी महाविद्यालय व्हॉलीबॉल संघ विजयी
By admin | Updated: September 20, 2014 00:39 IST