शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी, एसएओ शेताच्या बांधावर; पीक नुकसानाची केली पाहणी

By रवी दामोदर | Updated: February 27, 2024 17:34 IST

वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात सोमवारी मध्यरात्री अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसामुळे सोंगणीला आलेला गहू, हरभरा व लिंबूसह फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

अकोला : जिल्ह्यात सोमवारी अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना फटका बसला असून, प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावण्याची भीती आहे. दरम्यान मंगळवारी जिल्हाधिकारी अजीत कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत नुकसानाची पाहणी केली. तसेच संबंधित कर्मचाऱ्यांना नुकसानग्रस्त भागात पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.

जिल्ह्यात गत २४ तासांमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातले. वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात सोमवारी मध्यरात्री अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसामुळे सोंगणीला आलेला गहू, हरभरा व लिंबूसह फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुरुवातील खरीप हंगामात झालेले नुकसान व आता ऐन सोंगणीवेळी बसलेल्या अवकाळीच्या तडाख्याने शेतकरी हवालदील झाला आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी अजीत कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी अकोला तालुक्यातील वल्लभनगर, निंभोरा, कासली परिसरात थेट शेताच्या बांधावर जात नुकसानाची पाहणी केली व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच उपस्थित अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे सांगितले. याप्रसंगी कृषी, महसुल विभागाचे कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते.

जिल्ह्यात दि. २६ फेब्रुवारी रोजी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली असून, संबंधित कर्मचाऱ्यांना नुकसानग्रस्त भागात पंचनामे करण्याच्या सुचना दिल्या आहेत. तसेच पीक विमाधारक शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेअंतर्गत पूर्वसूचना नोंद करावी.

- शंकर किरवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला.

टॅग्स :Akolaअकोला