शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
3
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
4
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
5
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
6
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
7
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
8
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
10
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
11
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
12
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
13
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
14
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
15
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
16
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
17
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
18
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
19
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
20
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...

थंडीमुळे वाढला ‘फंगल इन्फेक्शन’चा धोका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 14:34 IST

गत काही दिवसांपासून शासकीय रुग्णालयांसह खासगी दवाखान्यांमध्ये त्वचा विकार विशेषत: फंगल इन्फेक्शनच्या रुग्णांची संख्या वाढली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वाढत्या थंडीमुळे ड्राय स्किनची समस्या वाढू लागली आहे. ड्राय स्किनमुळे त्वचेला खाज सुटत असून, अनेकांना ‘फंगल इन्फेक्शन’ची समस्यादेखील जाणवू लागली आहे. यावर नियंत्रणासाठी वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.जिल्ह्यात थंडीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे त्वचेच्या विविध समस्या डोके वर काढत आहेत. त्वचा कोरडी झाल्याने अंगाला खाज सुटण्याचे प्रमाण वाढले असून, यातील बहुतांश समस्या या फंगल इन्फेक्शनच्या असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. हिवाळ्यात प्रामुख्याने गरम वस्त्र परिधान केले जातात. शिवाय, थंडीमुळे अनेक जण आंघोळदेखील टाळतात. परिणामी, त्वचेमध्ये घाम मुरल्याने खाजेची समस्या उद््भवते. गत काही दिवसांपासून शासकीय रुग्णालयांसह खासगी दवाखान्यांमध्ये त्वचा विकार विशेषत: फंगल इन्फेक्शनच्या रुग्णांची संख्या वाढली आहे.फंगल इन्फेक्शनचा धोका टाळण्यासाठी वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.हिवाळ्याच्या दिवसांत त्वचेला खाज सुटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहनदेखील डॉक्टरांनी केले आहे.डॉक्टरांसाठीच ठरत आहे डोकेदुखीफंगल इन्फेक्शनच्या रुग्णांत वाढ होत असून, औषधोपचाराने काही काळासाठी रुग्णांना आराम पडत आहे; मात्र रुग्णांवर करण्यात येणाऱ्या औषधोपचारातून विषाणू नष्ट होत नसल्याने काही दिवसांतच पुन्हा फंगल इन्फेक्शन वाढत असल्याने रुग्ण त्रस्त झाले आहेत. औषध लागत नसल्याने डॉक्टरांसाठीही डोकेदुखी ठरत आहे.फंगल इन्फेक्शनचे प्रमाण वाढत आहे. जिन्ससारख्या अंगाला चिटकणारे वस्त्र परिधान करणे टाळावे, थंडी असली तरी नियमित आंघोळ करून शरीर स्वच्छ ठेवावे, फंगल इन्फेक्शनची समस्या जाणवल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधोपचार घ्यावा.- डॉ. मुकुंद अष्टपुत्रे, वैद्यकीय अधिकारी, जीएमसी.

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य