शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

तेल्हारा नाफेड तूर प्रकरण थांबविण्यासाठी सहकार नेते मुंबईत ठाण मांडून

By admin | Updated: June 30, 2017 20:25 IST

तेल्हारा: सहकार मंत्र्यांनी नाफेड तूर खरेदी प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिल्यानंतर, प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून काही सहकार नेते गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत ठाण मांडून आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : नाफेडने तूर खरेदी चालू केल्यानंतर बाजार समितीने पुरवणी टोकनाच्या नावावर मोठ्या प्रमाणात गैरप्रकार केल्याचे उधडकीस आले. एवढेच नव्हे तर एका प्राध्यापकाने मयत वडिलांच्या नावावर तूर मोजली. या गैरप्रकाराची चौकशी करून त्वरित अहवाल सादर करण्याचे आदेश सहकार मंत्र्यांनी दिल्यानंतर सदर प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून येथील सहकार नेते गेल्या तीन दिवसापासून मुंबईत ठाण मांडून आहेत.तेल्हारा बाजार समितीने नाफेड तूर खरेदीमध्ये १०० च्या जवळपास पुरवणी टोकन देऊन मोठ्या प्रमाणात गैरप्रकार केले. त्यांची तक्रार शेतकऱ्यांनी १६ मे रोजी थेट मुंबई गाठून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे दिल्यानंतर त्यांनी झालेल्या गैरप्रकाराची चौकशीचे आदेश दिले. त्यामुळे सदर प्रकरण गैरप्रकारात सहभागी असलेल्यांच्या अंगलट येण्याची शक्यता असल्याने सहकार नेते ही चौकशी थांबविण्यासाठी तीन दिवसापासून मुंबईत ठाण मांडून आहेत. नाफेडच्या तूर खरेदी प्रकरणात एवढ्या मोठ्याप्रमाणात गैरप्रकार होऊनही यातील अधिकारी ताठ मानेने फिरत आहेत. सदर प्रकरण ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर दुयम निबंधक कार्यालयाने चौकशी केली असली तरी अजूनपर्यंत काहीच कार्यवाही झाली नाही.