शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मुलांमधील नार्कोटिक्स कंट्रोलसाठी आता शाळांमध्ये प्रहरी क्लब

By नितिन गव्हाळे | Updated: July 2, 2024 22:02 IST

मादक पदार्थ तस्करीसह आहारी गेलेल्या मुलांना प्रतिबंध करणार

अकोला :शालेय विद्यार्थ्यांमध्ये ड्रग्स, मादक पदार्थांचे व्यसन वाढले असून, त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने कृती आराखडा तयार केला आहे. विद्यार्थ्यांमध्ये ड्रग्ज, मादक पदार्थ, तस्करीला प्रतिबंध करण्यासाठी जनजागृती करण्यात येणार असून, त्यासाठी शिक्षण आयुक्तांनी शाळांमधील इ. ६ वी ते १२ वीमधील २० ते २५ विद्यार्थ्यांचा समावेश करून प्रहरी क्लब स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. या क्लबच्या माध्यमातून मादक पदार्थ तस्करीसह अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या मुलांचे ब्रेन वॉश करून त्यांना प्रतिबंध करण्यात येणार आहे.

शिक्षण विभागाअंतर्गत त्यासाठी केंद्रस्तर ते राज्यस्तर नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात येणार आहेत. कार्यक्षेत्रातील सर्व माध्यमाच्या व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये प्रहरी क्लबसोबतच एनसीसी, एनएसएस, स्काऊट गाईड, इको क्लब, सांस्कृतिक क्लबच्या वतीने मादक पदार्थांचे दुष्परिणामबाबत जागरुकता, वैज्ञानिक माहिती बालकांना माहिती दिल्यास, त्यांना मादक द्रव्य सेवनांच्यापासून परावृत्त करता येऊ शकते. या क्लबमार्फत मादक द्रव्याच्या आहारी गेलेल्या अथवा जाऊ शकतील अशा वातावरणात राहणाऱ्या मुलांवर लक्ष ठेवणे व शैक्षणिक संस्थेच्या परिसरामधील होणाऱ्या मादक द्रव्य तस्करीस आळा घालणे आदी कामे होणार आहेत. गांधी स्मृती आणि दर्शन समिती मार्फत या प्रहारी क्लब मधील विद्यार्थी या क्लबमार्फत मादक द्रव्याच्या आहारी गेलेल्या अथवा जाऊ शकतील अशा वातावरणात राहणाऱ्या मुलांवर लक्ष ठेवणे व शैक्षणिक संस्थेच्या परिसरामधील होणाऱ्या मादक द्रव्य तस्करीस आळा घालणे या जबाबदाऱ्या पार पाडव्या लागणार आहेत.

असा नियुक्त करावा प्रहरी क्लब

प्रत्येक शाळेतील प्रहारी क्लबमध्ये इ. ६ ते १२ वी वर्गातील एकूण २० ते २५ मुलांचा समावेश करावा. या क्लबमधील सदस्य मादक द्रव्य हाताळणी व सेवन याबाबत संशयित विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवतील आणि याबाबतची गोपनीय माहिती नियुक्त शिक्षकापर्यंत पोहोचवतील.

शालेय मुलांमध्ये व्यसनाधिनता वाढू नये. या दृष्टीकोनातून प्रत्येक शाळेमध्ये प्रहरी क्लब सुरू करण्यात येणार आहे. शाळांनीसुद्धा विद्यार्थ्यांचा समावेश करून प्रहरी क्लब सुरू करून पालकांची बैठक घ्यावी. बैठकीमध्ये तसेच शिक्षक-पालक संघाच्या बैठकीमध्ये चर्चा करुन जागरुकता आणावी.-डॉ. सुचिता पाटेकर, शिक्षणाधिकारी माध्यमिक

टॅग्स :Drugsअमली पदार्थAkolaअकोला