शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

बंद झालेले वाइन बार पुन्हा सुरू होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 01:02 IST

अकोला : राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील वाइन बार, शॉप हटविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार जिल्हय़ातील २१७ परवाने रद्द करण्यात आले होते; परंतु आता या निर्णयात न्यायालयाने बदल केल्यामुळे बंद झालेले जिल्हय़ातील व मनपा क्षेत्रातील वाइन बार, शॉप, पुन्हा सुरू होणार आहे. त्यामुळे अकोल्यातील लिकर लॉबीमध्ये आनंदाला उधाण आले आहे. 

ठळक मुद्देपहिल्या टप्प्यात दीडशे वाइन बार, शॉप सुरू होतील!३७ देशी दारू दुकानांना प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील वाइन बार, शॉप हटविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार जिल्हय़ातील २१७ परवाने रद्द करण्यात आले होते; परंतु आता या निर्णयात न्यायालयाने बदल केल्यामुळे बंद झालेले जिल्हय़ातील व मनपा क्षेत्रातील वाइन बार, शॉप, पुन्हा सुरू होणार आहे. त्यामुळे अकोल्यातील लिकर लॉबीमध्ये आनंदाला उधाण आले आहे. राष्ट्रीय व राज्य मार्गावरील ५00 मीटर क्षेत्रात असलेल्या वाइन बार, वाइन शॉप, बीअर शॉपी हटविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यामुळे १ एप्रिलपासून राज्य उत्पादन शुल्क विभागाने वाइन बार, शॉप, देशी दारू दुकानांच्या परवान्यांचे नूतनीकरणच केले नाही. त्यामुळे जिल्हय़ातील २१७ वाइन बार, शॉप बंद झाले होते. यात शहरातील ११२ वाइन बार व दारूच्या दुकानांचासुद्धा समावेश होता. सद्यस्थितीत जिल्हय़ामध्ये देशी, विदेशी, परमिट रूम, होलसेलर, बीअर शॉपी असे एकूण २५0 दुकाने आहेत. त्यापैकी ८0 टक्के दारूची दुकाने, वाइन बार हे महामार्गावरच आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे जिल्हय़ातील अनेक वाइन बार, शॉप, बीअर शॉपी, देशी दारूची दुकाने बंद झाली, तर १९ वाइन शॉप आणि १२ बीअर शॉपला राष्ट्रीय व राज्य महामार्गापासून ५00 मीटर क्षेत्राबाहेर ही दुकाने हलविली होती. 

पहिल्या टप्प्यात दीडशे वाइन बार, शॉप सुरू होतील!सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे लिकर लॉबीला दिलासा मिळाला असून, जिल्हय़ात पहिल्या टप्प्यात दीडशे वाइन बार, शॉप, बीअर शॉपी सुरू होतील. 

३७ देशी दारू दुकानांना प्रतीक्षासर्वोच्च न्यायालयाने निर्णयात बदल करताना, देशी दारू दुकानांबाबत काही अटी व नियम लागू केले आहे. त्याची तपासणी केल्यानंतर या बंद ३७ दारू दुकानांना परवानगी मिळेल; परंतु तोपर्यंत त्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

कामगारांमध्ये उत्साहबार, वाइन शॉप बंद झाल्यामुळे हजारो कामगारांवर बेकारीची कुर्‍हाड कोसळली होती; परंतु आता पुन्हा किामगारांच्या हातांना पुन्हा काम मिळणार आहे, त्यामुळे बार कामगारांमध्ये उत्साह आहे. 

बुधवारी रात्रीपासून जिल्हय़ातील आणि मनपा हद्दीतील जवळपास दीडशे वाइन बार, शॉप, बीअर शॉपी सुरू होतील. उर्वरित बार, शॉप टप्प्याटप्प्याने सुरू होतील. देशी दारू दुकानांसंदर्भात अटी व नियमांची तपासणी केल्यानंतरच ही दुकाने सुरू होतील. - राजेश कावळे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क