शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

वातावरणीय बदलात येणार ‘क्लायमेट प्रूफ व्हिलेज’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:35 IST

अकोला : वर्तमानासोबतच येत्या काळात वातावरणात मोठय़ा  प्रमाणात होणार्‍या बदलांना सामोरे जाण्यासाठी ग्रामविकास  विभागाला ‘क्लायमेट प्रूफ व्हिलेज’ निर्मितीवर भर द्यावा  लागणार आहे. तर पर्यावरणातील इतरही घटकांमध्ये बदलांच्या  उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्यामध्ये वाढते तापमान,  रोगराई, पिकांची तग धरण्याची क्षमता यावर उपाय करावे  लागणार आहेत.

ठळक मुद्देपर्यावरणातील घटकांमध्ये मोठय़ा प्रमाणात बदलाचे उपायमोठय़ा प्रमाणात उपाययोजना सुचवलेले घटक

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वर्तमानासोबतच येत्या काळात वातावरणात मोठय़ा  प्रमाणात होणार्‍या बदलांना सामोरे जाण्यासाठी ग्रामविकास  विभागाला ‘क्लायमेट प्रूफ व्हिलेज’ निर्मितीवर भर द्यावा  लागणार आहे. तर पर्यावरणातील इतरही घटकांमध्ये बदलांच्या  उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्यामध्ये वाढते तापमान,  रोगराई, पिकांची तग धरण्याची क्षमता यावर उपाय करावे  लागणार आहेत.येत्या २0३0 दरम्यानच्या काळात किमान तापमानात होणार्‍या  वाढीचा मानवी आरोग्य आणि पिकांच्या उत्पादनावर होणार्‍या  परिणामांचा अंदाज घेत शासनाने कृती आराखडा तयार केला  आहे. त्यासाठी उपाययोजनांचा आराखडाही देण्यात आला.  शासनाने मार्च २0१0 पासूनच यू.के. मेट ऑफिस व द एनर्जी  रिसोर्स संस्था (टेरी) या संस्थांच्या सहकार्याने सविस्तर कृती  आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले होते. कृती  आराखड्यात २0२१ ते २0४0 या कालखंडाचा प्रामुख्याने  विचार झाला आहे. त्यापुढे आणखी २0५0 व २0७0 या दोन  टप्प्यातील वातावरण आणि त्याचा आरोग्य, पिकांवर होणार्‍या  परिणामांचाही अंदाज घेण्यात आला. त्यानुसार जागतिक वा तावरणीय बदलामुळे कमालपेक्षा किमान तापमानामध्ये मोठी  वाढ होणार आहे. त्याचा परिणाम पर्जन्यमान, उष्णता व आद्र्र तेवर होणार आहे. वातावरणात होणार्‍या बदलातही मानवी  जीवन, पिके, पर्यावरणातील घटकांनी तग धरावी, यासाठी  मोठय़ा प्रमाणात उपाययोजना करण्याचे आव्हान शासनापुढे उभे  ठाकले आहे. त्यानुसार आता उपाययोजना केल्याशिवाय गत्यंतर  नसल्याची वेळ आली आहे. काय आहे ‘क्लायमेट प्रूफ व्हिलेज’येत्या काळात वातावरणीय बदलास पूरक ठरणार्‍या गावांची  निर्मिती करावी लागणार आहे. त्यामध्ये गावपातळीवर  लोकसहभागातून पर्यावरण संवर्धनासाठी उपक्रम राबवणे,  जलसंधारण, डोंगर दत्तक घेणे, नदी दत्तक घेणे, गावतळे,  गावाची वनराई योजनांचा विकास करणे, गावनिहाय सौर ऊर्जा,  पवन ऊर्जा आधारित स्वतंत्र ग्रिड तयार करून ऊर्जा निर्भर  गावांची निर्मिती केली जाणार आहे.  शहरात पाण्याचा पुनर्वापर बंधनकारकअतवृष्टीची समस्या निर्माण होणार आहे. त्यामुळे शहरात  सखल भागात बांधकामांना अनुमती देताना धोरण ठरवावे  लागणार आहे. पुरांची तीव्रता आणि वारंवारिता वाढणार आहे. त्यामुळे नदीकाठावर उच्चतम पूर रेषेपलीकडे बांधकामास  अनुमती देणे, पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी सांडपाणी  प्रक्रिया, पुनर्चक्रण व पुनर्वापर बंधनकारक केले जाणार आहे.  पर्यावरणपूरक शहरे विकसित करणे, हरितगृह वायूंचे प्रमाण  कमी करण्यासाठी नागरी घनकचरा व सांडपाणी व्यवस्था पनाबाबत धोरण ठरणार आहे. 

मोठय़ा प्रमाणात उपाययोजना सुचवलेले घटकवातावरणातील बदलात तग धरण्यासाठी जे घटक आणि  शासनाच्या विभागाकडून बदल करणे आवश्यक आहे, त्याची  यादी मोठी आहे. त्यामध्ये वने, जलसंपदा, कृषी, ऊर्जा,  आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, आपत्ती व्यवस्थापन,  ग्रामविकास, नगर विकास, वित्त व नियोजन, पर्यावरणाचा  समावेश आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत