शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

१९ गावांत पाणीटंचाई निवारणाच्या कामांचा मार्ग मोकळा! जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

By संतोष येलकर | Updated: May 10, 2024 21:47 IST

विंधन विहिरी, कूपनलिकांच्या २० कामांना मंजुरी

संतोष येलकर, अकोला: जिल्ह्यातील पातूर आणि बाळापूर या दोन तालुक्यांतील १९ गावांत पाणीटंचाई निवारणासाठी विंधन विहिरी व कूपनलिकांच्या २० कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी ८ मे रोजी दिला. त्यामुळे संबंधित गावांतील पाणीटंचाई निवारणाच्या कामांचा मार्ग मोकळा झाला आहे. तापत्या उन्हासोबतच जिल्हयातील विविध भागात पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले असून, टंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी मंजूर कृती आराखड्यात समाविष्ट उपाययोजनांच्या कामांचे प्रस्ताव जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्यात येत आहेत. त्यानुषंगाने पातूर व बाळापूर या दोन तालुक्यातील २० गावांमध्ये २८ लाख ५९ हजार ४८६ रुपये अपेक्षित खर्चाच्या विंधन विहिरी व कूपनलिकांच्या २० कामांना जिल्हाधिकारी कुंभार यांच्या आदेशानुसार प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. त्यामध्ये बाळापूर पातूर तालुक्यातील १२ गावांत १२ विंधन विहिरी आणि बाळापूर तालुक्यातील ७ गावांत ५ कूपनलिका व ३ विंधन विहिरींच्या कामांचा समावेश आहे.

पातूर व बाळापूर तालुक्यातील ‘या’ १९ गावांत २० कामे मंजूर!

  • बाळापूर तालुका : हिंगणा, निंबी, सोनाळा, बहापुरा, वझेगाव या पाच गावांत प्रत्येकी एक कूपनलिका आणि नांदखेड येथे एक व रिधोरा येथे दोन विंधन विहिरींची कामे मंजूर करण्यात आली.
  • पातूर तालुका : बोडखा, शिर्ला, विवरा, जांभरुण, भंडारज बु., आलेगाव, माळराजुरा, गाेंधळवाडी, जांब, पाचरण, वनदेव व आसोला या १२ गावांमध्ये १२ विंधन विहिरींची कामे मंजूर करण्यात आली.

कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश!

प्रशासकीय मंजूरी देण्यात आलेली पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची संबंधित कामे येत्या ३१ मेपर्यंत किंवा त्यापूर्वी पूर्ण करून, प्रत्यक्ष पाणीपुरवठा करण्यात यावा. ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही, याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कुंभार यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

टॅग्स :Akolaअकोला