शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शहर हगणदरीमुक्त; अडीच कोटींच्या अनुदानाला शासनाचा ‘खो’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 13:17 IST

हगणदरीमुक्त घोषित झालेल्या शहरांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून अडीच कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त होणार होते. शासनाला मागील सहा महिन्यांपासून अडीच कोटींच्या अनुदानाचा विसर पडलाच कसा, असा सवाल उपस्थित होत आहे.

ठळक मुद्दे जानेवारी २०१८ मध्ये केलेल्या तपासणीत अकोला शहर हगणदरीमुक्त असल्याचे आढळून आले होते.हगणदरीमुक्त घोषित झालेल्या शहरांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून अडीच कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त होणार होते. हगणदरीमुक्त घोषित केलेल्या अकोला महापालिकेला अद्यापही अडीच कोटींचे अनुदान मिळाले नाही, हे विशेष.

- आशिष गावंडे

 अकोला:  स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत केंद्र शासनाच्या क्वॉलिटी कौन्सिल आॅफ इंडियाने जानेवारी २०१८ मध्ये केलेल्या तपासणीत अकोला शहर हगणदरीमुक्त असल्याचे आढळून आले होते. त्यानुषंगाने केंद्रीय समितीने राष्ट्रपती, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शहराला हगणदरीमुक्त घोषित केले होते. हगणदरीमुक्त घोषित झालेल्या शहरांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून अडीच कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त होणार होते. कचऱ्याच्या विलगीकरणासाठी सतत निरनिराळे प्रयोग राबविण्याचे महापालिकांना निर्देश देणाºया शासनाला मागील सहा महिन्यांपासून अडीच कोटींच्या अनुदानाचा विसर पडलाच कसा, असा सवाल उपस्थित होत आहे.‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात शहराला हगणदरीमुक्त करण्यासाठी महापालिका क्षेत्रात ज्या नागरिकांकडे वैयक्तिक शौचालये नाहीत, त्यांचा शोध घेऊन त्यांना शौचालय बांधून देण्याचे शासनाचे निर्देश होते. त्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून मनपा प्रशासनाला निधी प्राप्त झाला. २०१६ ते २०१७ या दोन वर्षांच्या कालावधीत प्रशासनाने शहरी भागात पात्र लाभार्थींचा शोध घेऊन त्यांना शौचालये बांधून दिली. यामध्ये सार्वजनिक शौचालयांसह १८ हजार ६७० शौचालयांचा समावेश होता. मनपाने अकोलेकरांमध्ये जनजागृती करीत उघड्यावर शौचास बसल्यास रोगराई पसरत असल्याची जाणीव करून दिली. त्यापूर्वी राज्य शासनाच्या चमूने शहराचे सर्वेक्षण केल्यानंतर शहराला हगणदरीमुक्त घोषित केले होते. मनपाच्या दाव्याची पुन्हा पडताळणी करण्यासाठी १५ फेब्रुवारी २०१८ रोजी केंद्र शासनाच्या क्वॉलिटी कौन्सिल आॅफ इंडियाच्या प्रतिनिधींनी शहरात दाखल होत सार्वजनिक शौचालयांसह काही ठरावीक भागाची पाहणी केली होती. पाहणीचा अहवाल केंद्रीय समितीकडे सादर केल्यानंतर केंद्रीय समितीने शहर हगणदरीमुक्त झाल्याचे घोषित केले होते.अडीच कोटींचे अनुदान मिळालेच नाही!‘स्वच्छ भारत’ अभियानच्या पहिल्या टप्प्यात शहरांना हगणदरीमुक्त करण्याचा समावेश होता. दुसºया टप्प्यात कचºयाचे ओला आणि सुका असे विलगीकरण करून, त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा समावेश आहे. यासाठी राज्य शासनाकडून महापालिकांना वेळोवेळी दिशानिर्देश दिले जात असून, वेळप्रसंगी महापालिकांचे अनुदान बंद करण्याचा इशाराही दिला जात आहे. दुसरीकडे हगणदरीमुक्त घोषित केलेल्या अकोला महापालिकेला अद्यापही अडीच कोटींचे अनुदान मिळाले नाही, हे विशेष.

राष्ट्रपती, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गौरवकेंद्रीय समितीने राज्यात हगणदरीमुक्त घोषित केलेल्या महापालिका, नगरपालिका, नगर परिषदांचा मुंबईत राष्ट्रपती, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गुणगौरव केला होता. हगणदरीमुक्त झालेल्या महापालिकांना निकषानुसार केंद्र व राज्य शासनाकडून अडीच कोटी रुपये तसेच नगरपालिकांसाठी एक कोटी रुपये अनुदानाची तरतूद करण्यात आली होती, हे येथे उल्लेखनीय.

शहर स्वच्छतेच्या मुद्यावर तपासणी करण्यासाठी सप्टेंबर महिन्यात केंद्राची चमू अकोल्यात दाखल होत आहे. त्यावेळी रखडलेल्या अनुदानाचा विषय उपस्थित केला जाईल. त्या पृष्ठभूमीवर रविवारी आढावा घेण्यात आला.-जितेंद्र वाघ आयुक्त, मनपा

 

टॅग्स :AkolaअकोलाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका