शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

प्लॉट खरेदी-विक्रीच्या कारणावरून हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 13:31 IST

अकोला -रेल्वे स्टेशनसमोरील प्रसिद्ध असलेल्या आनंद रेस्टॉरंटचे संचालक आनंद अग्रवाल यांच्यावर तीन ते चार जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली.

अकोला -रेल्वे स्टेशनसमोरील प्रसिद्ध असलेल्या आनंद रेस्टॉरंटचे संचालक आनंद अग्रवाल यांच्यावर तीन ते चार जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. या हल्ल्यात आनंद अग्रवाल गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत, तर आनंद अग्रवाल व त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या हल्ल्यात पुरोहित यांच्यासह काही जण जखमी झाले असून, त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत.आनंद अग्रवाल यांच्या रामदास पेठेतील दत्त मंदिराजवळ असलेल्या सुमारे पाच हजार चौरस फूट प्लॉटचा गत अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. याच प्लॉटच्या वादातून प्रॉपर्टी ब्रोकर ऋषी पुरोहित व त्याच्या चार ते पाच साथीदारांनी सोमवारी सायंकाळी आनंद अग्रवाल हे रेल्वे स्टेशनसमोरील रेस्टॉरंटमध्ये असताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यामध्ये अग्रवाल गंभीर जखमी झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी रामदास पेठ पोलिसांना माहिती दिली. रामदास पेठचे ठाणेदार शैलेष सपकाळ यांनी पोलिसांसह घटनास्थळावर धाव घेऊन अग्रवाल यांना तातडीने उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविले. त्यानंतर घटनास्थळ पंचनामा करण्यात आला असून, अग्रवाल यांच्यावर हल्ला करणाऱ्यांचा शोध सुरू केला आहे, तसेच आनंद अग्रवाल व आशिष अग्रवाल यांच्यासह काही आरोपींनी ऋषी पुरोहित व त्यांच्या मित्रावर हल्ला केला असून, यामध्ये पुरोहित व काही जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अग्रवाल याने प्लॉटचा खरेदी-विक्रीचा व्यवहार केल्यानंतर टाळाटाळ केल्याने ही हाणामारी झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. आनंद रेस्टॉरंट येथे दोन्ही गटात हाणामारी झाली. दोन्ही गटातील काही जण जखमी झाले असून, त्यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन्ही गटाने परस्परविरुद्ध तक्रार दिली असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रामदास पेठेतील प्लॉटचा इसार करून दिल्यानंतर खरेदी न करून दिल्यामुळे ही हाणामारी झाल्याची माहिती आहे.शैलेष सपकाळठाणेदार, रामदास पेठ पोलीस स्टेशन.

 

टॅग्स :AkolaअकोलाRamdas Peth Police Stationरामदासपेठ पोलीस स्टेशन