शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

शहराचा पाणीपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:21 IST

रस्त्यांवर झाडांच्या फांद्या कायम अकोला : शहरात १८ मे रोजी रात्री अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे विविध भागांतील अनेक लहान-मोठे वृक्ष ...

रस्त्यांवर झाडांच्या फांद्या कायम

अकोला : शहरात १८ मे रोजी रात्री अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे विविध भागांतील अनेक लहान-मोठे वृक्ष उन्मळून पडले. त्यामुळे अनेक ठिकाणच्या विद्युतवाहिन्या खंडित झाल्या होत्या. दरम्यान, सहा दिवस उलटून गेल्यावरही जय हिंद चौकातील पोलीस चौकीसमोर मुख्य रस्त्यावर झाडांच्या फांद्या पडून असल्याचे चित्र कायम आहे. यामुळे बॅरिकेड्स लावून हा रस्ता बंद करण्यात आला आहे.

जलवाहिनी टाकली; माती जैसे थे!

अकाेला : जुन्या शहरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मैदान ते श्रीवास्तव चाैकापर्यंत मुख्य जलवाहिनीसाठी रस्त्यालगत खाेदकाम करण्यात आले़ मागील दहा ते बारा दिवसांपासून सुरू असलेल्या खाेदकामादरम्यान जलवाहिनीचे जाळे टाकल्यानंतर रस्त्यावर मातीचा भराव कायम असल्याचे चित्र आहे़ यामुळे स्थानिक रहिवाशांना व वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे़

खडकी येथे जलवाहिनीवर अवैध नळजोडणी

अकोला : शहराच्या विविध भागांत अवैधरीत्या नळजोडणी घेण्यात आली आहे. खडकी येथे मोठ्या पुलाखाली मनपाच्या मुख्य जलवाहिनीवर अवैधरीत्या नळजाेडणी घेऊन त्या माध्यमातून दिवसभर पाण्याचा बेसुमार वापर केला जात आहे. हा प्रकार मनपा जलप्रदाय विभागाच्या निदर्शनास येत असतानाही कारवाई केली जात नसल्याचे चित्र आहे.

रस्त्यावर बांधकाम साहित्य

अकोला : जुन्या शहरातील प्रभाग क्रमांक ९ अंतर्गत येणाऱ्या भगीरथवाडी परिसरात रस्त्यावर बांधकाम साहित्य पडून आहे. यामध्ये रेती, विटा, गिट्टीचा समावेश असून अनेक दुचाकी वाहनधारक, सायकलस्वार यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सदर साहित्य मनपाने त्वरित जप्त करण्याची गरज असताना मनपाकडून दुर्लक्ष केले जात आहे़

अकोटफैल चाैकात अस्वच्छता

अकोला : शहरातील सर्वाधिक गजबजलेल्या अकोटफैल चाैकात साफसफाईअभावी प्रचंड घाण व कचरा साचल्याचे दिसून येते. या चौकात मातीचे ढीग व नाले, गटारातील साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे मनपाच्या आराेग्य निरीक्षकांनी लक्ष देण्याची मागणी हाेत आहे.

खड्डा ठरतोय जीवघेणा

अकोला : जुन्या शहरातील श्रीवास्तव चाैक ते शिवचरण पेठ मुख्य मार्गावर जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी मनपा प्रशासनाने भला मोठा खड्डा खोदून ठेवला आहे. या मार्गावर वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. तसेच या ठिकाणी दररोज बाजार भरतो. हा खड्डा जीवघेणा ठरण्याची चिन्हे पाहता तातडीने बुजविण्याची मागणी होत आहे.

''दररोज पाणीपुरवठा करावा''!

अकोला :‘अमृत’ योजनेंतर्गत पाणीपुरवठा वितरण प्रणालीत जुन्या जलवाहिन्यांच्या बदल्यात नवीन जलवाहिन्या टाकल्या जात असून पाण्याचे काटेकोर नियोजन करण्यासाठी नळांना मीटर लावले जात आहे. परंतु, दैनंदिन पाणीपुरवठा हाेत नसल्याने रहिवाशांमध्ये नाराजी आहे. मनपाने दररोज पाणीपुरवठा करण्याची मागणी प्रभाग-१ मधील राष्ट्रवादीचे नगरसेवक अब्दुल रहीम पेंटर यांनी केली आहे.