शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शौचालयांचा घोळ सिद्ध होईपर्यंत शहराला ‘ओडीएफ’चा दर्जा नाहीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 12:49 IST

शहराला ‘ओडीएफ’चा (उघड्यावर शौचास मुक्त) दर्जा दिला जाणार नसल्याचा निर्णय महापौर विजय अग्रवाल यांना घ्यावा लागला.

अकोला: केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शहरात ‘जिओ टॅगिंग’ न करताच बांधण्यात आलेल्या शौचालयांमध्ये मोठा घोळ असून, चौकशी अहवाल प्राप्त होईपर्यंत शहराला ‘ओडीएफ’चा (उघड्यावर शौचास मुक्त) दर्जा दिला जाणार नसल्याचा निर्णय महापौर विजय अग्रवाल यांना घ्यावा लागला. सत्तापक्षातील नगरसेवकांसह शिवसेना नगरसेवकांच्या आक्रमक भूमिकेमुळे महापौरांसह प्रशासनाला ‘बॅकफुट’वर जावे लागल्याचे यावेळी दिसून आले.शहरात ‘जिओ टॅगिंग’चे सर्व निकष-नियम पायदळी तुडवित उभारण्यात आलेल्या १८ हजारपेक्षा जास्त शौचालयांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असतानाच मनपा प्रशासन ‘ओडीएफ’चा (उघड्यावर शौचास मुक्त) दर्जा मिळविण्यासाठी आग्रही होते. शौचालय बांधकामातील घोळ तपासण्यासाठी चौकशी समितीचे गठन करण्यात आले असून, समितीचा अहवाल प्राप्त होईपर्यंत शहराला ‘ओडीएफ’चा दर्जा न देण्याची मागणी भाजप नगरसेवक अजय शर्मा, बाळ टाले, विजय इंगळे, सुनील क्षीरसागर, अनिल गरड, गिरीश गोखले यांच्यासह शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा, मंजूषा शेळके, काँग्रेसचे पराग कांबळे, भारिप-बमसंच्या गटनेत्या अ‍ॅड. धनश्री देव यांनी लावून धरली. भाजप नगरसेवकांची आक्रमक भूमिका लक्षात घेता महापौर विजय अग्रवाल यांना अखेर विषयसूचीवरील ‘ओडीएफ’चा विषय रद्द करावा लागला.२९ कोटींचे आॅडिट केलेच नाही!शहराची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय समितीच्या सदस्यांना स्वच्छता विभागातील लिपिकाने महागड्या हॉटेलमध्ये दारू, बिअर व जेवण दिले. त्या देयकाचे मनपा प्रशासनाने रीतसर आॅडिट केले. २०१५ ते २०१८ या तीन वर्षांच्या कालावधीत १८ हजारपेक्षा जास्त शौचालयांची उभारणी करताना प्रशासनाने २९ कोटींचे देयक अदा केले. केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त २९ कोटी रुपयांचे मनपाने आजपर्यंत आॅडिट का केले नाही, असा सवाल उपस्थित करीत नगरसेवक विजय इंगळे यांनी सभागृहात खळबळ उडवून दिली. त्यावर लेखाधिकारी मनजित गोरगावकर समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. अखेर मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांनी शासन निधीचे आॅडिट करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

‘ओडीएफ’ला मंजुरी देऊ नका, अन्यथा...वैयक्तिक शौचालयांच्या उभारणीत मनपा कर्मचारी, आरोग्य निरीक्षक, कंत्राटदारांनी मोठा आर्थिक घोळ केल्याचा आरोप नगरसेवक अजय शर्मा यांनी केला. प्रशासनाने ‘ओडीएफ’ला मंजुरी देऊ नये, अन्यथा प्रशासनाविरोधात फौजदारी दाखल करण्याचा इशारा नगरसेवक शर्मा यांनी देताच, प्रशासन अवाक् झाले.‘पीडीकेव्ही’ची पाच एकर जमीन घेण्याला मंजुरीभूमिगत गटार योजनेतील मलनिस्सारण प्रकल्प उभारण्यासाठी पीडीकेव्ही प्रशासनाची पाच एकर जमीन घेण्यावर सभागृहाने शिक्कामोर्तब केले. यावर शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा, काँग्रेस नगरसेवक डॉ. जिशान हुसेन यांनी तीव्र आक्षेप नोंदविला. सविस्तर चर्चेअंती या विषयाला महापौर विजय अग्रवाल यांनी मंजुरी दिली.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका