शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कोवॅक्सिनच्या दुसऱ्या डोससाठी नागरिक ताटकळत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:19 IST

अकोट : कोरोना साथरोगाने अकोट तालुक्याला विळखा घातला आहे. गत सहा दिवसानंतर लस उपलब्ध झाल्याने नागरिकांनी लसीकरण केंद्रावर ६ ...

अकोट : कोरोना साथरोगाने अकोट तालुक्याला विळखा घातला आहे. गत सहा दिवसानंतर लस उपलब्ध झाल्याने नागरिकांनी लसीकरण केंद्रावर ६ मे रोजी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, कोवॅक्सिन उपलब्ध झाल्यानंतरही तिचा दुसरा डोस मिळत नसल्याने अनेक जणांना ताटकळत प्रतीक्षा करावी लागत आहे. लसीकरण केंद्रावरील ही गर्दी पाहता कोरोनाचे संक्रमण वाढण्याची शक्यता आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तालुक्यात २० जणांचा मृत्यू झाला. ४०० रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे लस घेण्याकरिता नागरिकांनी लगबग सुरू केली आहे. दरम्यान, लसीकरणाची वेबसाईट अनेकदा बंद येत असल्याने नागरिकांची नोंदणी होत नाही. तर रात्री एकदम या वेबसाईटवर नोंदणीचा कोटा पूर्ण झाल्याची माहिती अपडेट होत आहे.

फोटो: मेल फोटोत

अनेकांची दुसरा डोस घेण्याची मुदत संपली

ज्या नागरिकांनी कोवॅक्सिनचा पहिला डोस घेतला होता. त्यातील अनेकांची दुसरा डोस घेण्याची मुदत संपली आहे. परंतु त्यांना कोवॅक्सिन उपलब्ध झाल्यावरही दुसरा डोस मिळत नसून कोवॅक्सिनचा १८ ते ४५ वयोटातील नागरिकांना पहिला डोस मात्र देण्यात येत आहे. प्रशासन हा संभ्रम दूर करण्यात अपयशी ठरत असल्याने नागरिकांचा संयम सुटत आहे. आधी कोवॅक्सिन घेतलेल्या लोकांना दुसरा डोस मिळत नाही, मात्र कोवॅक्सिननंतर आलेल्या कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस मात्र ७० टक्के उपलब्ध करण्यात आला होता. तर पहिल्या डोससाठी मात्र ३० टक्के लस उपलब्ध करण्यात आली होती. त्यामुळे लस घेण्याकरिता लसीकरण केंद्रावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

आरोग्य यंत्रणेची दमछाक

लसीकरण केंद्रांवर गर्दी होत असल्याने अपुऱ्या मनुष्यबळाअभावी आरोग्य यंत्रणेची चांगलीच दमछाक होत आहे. केंद्रांवर शासनाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. सुरक्षित अंतर न ठेवता व नोंदणी पडताळणीला उशीर लागत असल्याने गर्दी होत आहे. परंतु दुसरा डोस न मिळालेल्या नागरिकांसुद्धा या ठिकाणी ताटकळत बसावे लागत आहे.