शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पानठेल्यांवर सर्रास सिगारेट, तंबाखूची जाहिरात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 12:34 IST

कोटपा कायद्यानुसार, थेट कंपन्यांवर कारवाई अपेक्षित आहे; मात्र संबंधित विभागाकडून याप्रकरणी कुठलीच कारवाई होत नाही.

- प्रवीण खेते  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांची थेट जाहिरात करणे हा कायद्याने गुन्हा असला तरी, उत्पादन कंपन्यांमार्फत जिल्ह्यातील पानठेल्यांवर या उत्पादनांची थेट जाहिरात करीत आहेत. कोटपा कायद्यानुसार, थेट कंपन्यांवर कारवाई अपेक्षित आहे; मात्र संबंधित विभागाकडून याप्रकरणी कुठलीच कारवाई होत नाही.राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत शाळा, महाविद्यालयांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात येते; मात्र दुसरीकडे तंबाखू व तंबाखूजन्य उत्पादनांची सार्वजनिक ठिकाणी थेट जाहिरात केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोटपा कायद्यांतर्गत उत्पादक कंपन्यांनी तंबाखूमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची जाहिरात करणे अपेक्षित आहे; मात्र असे न करता उत्पादक कंपन्या सार्वजनिक ठिकाणी थेट तंबाखू व तंबाखूजन्य उत्पादनाची जाहिरात करताना दिसतात. हा प्रकार कायद्याने गुन्हा असला तरी, त्यावर कुठलीच कारवाई केली जात नाही, हे वास्तव आहे. पोलिसांकडून होणारी कारवाई ही तंबाखू व तंबाखूजन्य उत्पादनाची वाहतूक करणाऱ्यांवर होते; मात्र उत्पादक कंपन्यांकडून जाहिरात होत असल्यास संबंधित कंपन्यांवर कुठलीच कारवाई होत नाही, हे विशेष.पोलीस अन् अन्न व औषध प्रशासनाला कारवाईचे निर्देशतंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी सोमवार ,१६ डिसेंबर रोजी तंबाखू नियंत्रण समितीची बैठक घेतली होती. बैठकीत त्यांनी शहरासह ग्रामीण भागातील पानठेल्यांवर सिगारेट किंवा तंबाखूची जाहिरात करणारे फलक आढळल्यास थेट संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाईचा आदेश दिला होता.

तालुका व गाव स्तरावरही समितीशहरी भागासह ग्रामीण भागातही तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी तालुका आणि गावपातळीवर स्वतंत्र तंबाखू नियंत्रण समिती गठित करण्यात येणार आहे. ही समिती बीडीओ यांच्या नियंत्रणाखाली काम करणार आहे.तंबाखू किंवा तंबाखूजन्य उत्पादनाची जाहिरात करणे कायद्याने गुन्हा आहे. असे केल्यास संबंधित कंपन्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भात तंबाखू नियंत्रण समितीच्या बैठकीत जिल्हाधिकाºयांनी पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाला कारवाईबाबत निर्देश दिले होते.- डॉ. राजकुमार चव्हाण,जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाTobacco Banतंबाखू बंदी