शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

‘स्थायी’च्या सभापती पदासाठी चुरस; इच्छुकांची ‘लॉबिंग’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 01:03 IST

अकोला : महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती पदाचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे येत्या १३ मार्च रोजी सभापती पदाची निवड प्रक्रिया पार पडणार आहे. १६ सदस्यीय स्थायी समितीत भाजपाचे संख्याबळ १० असल्यामुळे साहजिकच सभापती पदाच्या विजयाची माळ भाजप उमेदवाराच्या गळ््यात पडणार आहे. पक्षातील नगरसेवकांची संख्या, शहराचे भौगोलिक व राजकीयदृष्ट्या समीकरण लक्षात घेऊन दावेदार निवडल्या जाणार असल्याने पक्षात चुरस निर्माण झाली आहे. 

ठळक मुद्दे१३ मार्च रोजी निवड प्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती पदाचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे येत्या १३ मार्च रोजी सभापती पदाची निवड प्रक्रिया पार पडणार आहे. १६ सदस्यीय स्थायी समितीत भाजपाचे संख्याबळ १० असल्यामुळे साहजिकच सभापती पदाच्या विजयाची माळ भाजप उमेदवाराच्या गळ््यात पडणार आहे. पक्षातील नगरसेवकांची संख्या, शहराचे भौगोलिक व राजकीयदृष्ट्या समीकरण लक्षात घेऊन दावेदार निवडल्या जाणार असल्याने पक्षात चुरस निर्माण झाली आहे. महापालिकेच्या आर्थिक व इतर विषयाच्या धोरणासंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्याचे अधिकार स्थायी समितीला प्रदान करण्यात आले आहेत. त्यामुळे स्थायी समितीच्या सभापती पदाला मानाचे स्थान आहे. १६ सदस्यीय स्थायी समितीमध्ये सदस्य पदावर वर्णी लागण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवक जीवाचे रान करीत असतात. या समितीमध्ये जाण्यासाठी किमान एकदा तरी संधी मिळावी, म्हणून पक्षाकडे ‘लॉबिंग’ करण्यासह स्वत:चे महत्तव पटवून देण्याचाही अनेकदा प्रयत्न केला जातो. या समितीने एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्यामुळे नियमानुसार आठ सदस्यांना ईश्वर चिठ्ठीद्वारे निवृत्त व्हावे लागले होते. त्यांच्या जागेवर नवीन सदस्यांची निवड करण्यात आली. विद्यमान सभापती बाळ टाले यांचा कार्यकाळ ३ मार्च रोजी संपुष्टात आल्यामुळे  १३ मार्च रोजी मनपात विशेष सभेमध्ये सभापती पदाची निवड प्रक्रिया पार पडणार आहे. भाजपाने मनपात सत्ता स्थापन केल्यानंतर सभापती पदाची पहिली संधी बाळ टाले यांना दिली. टाले यांनी एक वर्षाचा कार्यकाळ यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर, सभापती पदासाठी अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून बसल्याचे चित्र आहे. नगरसेवकांची एकूण संख्या व राजकीय समीकरणे पाहता स्थायी समितीमध्ये बहुतांश नगरसेवकांची निवड करण्याकडे पक्षाचा कल दिसून येतो. सभापती पदासाठी भाजपात अंतर्गत चुरस निर्माण झाली असून, यामध्ये कोणाची लॉटरी लागते, याकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे. 

‘स्थायी’मध्ये यांचा समावेश! सत्ताधाºयांच्यावतीने ‘स्थायी’मध्ये नगरसेवक अनिल गरड, विनोद मापारी, नंदा पाटील, शारदा खेडकर, अर्चना मसने यांची निवड करण्यात आली. तर बाळ टाले,  सुनील क्षीरसागर, सुजाता अहिर, विशाल इंगळे, पल्लवी मोरे समितीत कायम आहेत. राजकीय समीकरणे लक्षात घेता प्रभाग ८ चे सुनील क्षीरसागर, नंदा पाटील, विशाल इंगळे तसेच अर्चना मसने यांच्यापैकी एकाची सभापती पदासाठी निवड केली जाऊ शकते. वेळप्रसंगी अनिल गरड, शारदा खेडकर यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो.  

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिका