शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
4
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
5
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
6
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
7
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
8
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
9
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
10
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
11
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
12
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
13
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
14
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
15
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
16
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
17
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
18
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
19
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!

नाट्य स्पर्धेत बालक सिद्ध करीत आहेत ‘हम भी कुछ  कम नही’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 01:32 IST

अकोला: विश्‍वास करंडक बाल नाट्य स्पर्धेच्या  माध्यमातून विविध शाळांमधील चिमुकल्या कलावं तांनी सिद्ध करू न दाखविले, की ‘हम भी कुछ कम  नही’. स्पर्धेत ३७ शाळांनी सहभाग घेतला आहे.

ठळक मुद्देदुसर्‍याही दिवशी बालकलाकारांनी नाट्यस्पर्धेत  आणली रंगत रसिकांची गर्दी वाढली!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: विश्‍वास करंडक बाल नाट्य स्पर्धेच्या  माध्यमातून विविध शाळांमधील चिमुकल्या कलावं तांनी सिद्ध करू न दाखविले, की ‘हम भी कुछ कम  नही’. स्पर्धेत ३७ शाळांनी सहभाग घेतला आहे.७ सप्टेंबरपासून सुरू  झालेल्या या स्पर्धेत १८ शाळांनी  विविध चाकोरीतील १८ नाटके सादर केलीत. यातील  बहुतांश नाटकांमध्ये बाल कलावंतांनी अपेक्षेपेक्षा सुंदर  भूमिका वठविल्या. प्रत्येक नाटकातून समाजास कोण तातरी मोलाचा संदेश देण्याचे काम बाल कलावंत करी त आहेत. स्पर्धेत जागेश्‍वर विद्यालय वाडेगाव यांचे ‘मी तुमची  मुलगी बोलते’, कनुभाई वोरा अंध विद्यालय मलकापूर  यांचे ‘मला पण बोलू द्या!’, जागृती विद्यालयाचे  ‘घुसमट’, स्कूल ऑफ स्कॉलर्सचे ‘नो दि वर्ल्ड’,  विवेकानंद विद्यालयाचे ‘एकच प्रेरणा महत्त्वाची’,  लिटिल स्टारचे ‘बेटी बचाओ’ आणि सन्मित्र स्कूलचे  ‘सोहनचे स्वप्न’ नाटकांचा समावेश आहे. ११ सप्टेंबर पर्यंत चालणार्‍या या स्पर्धेत आणखी १९ नाटके सादर  होणार आहेत. 

अंध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा डोळस अभिनय कनुभाई वोरा अंध विद्यालय मलकापूर येथील अंध  बालकांनी ‘मला पण बोलू द्या!’ नाटक सादर केले. डॉ.  सुनील गजरे लिखित या बाल नाट्यात अश्‍विनी पाठे,  अमित बहादुरे, शुभम वानखडे, सागर वाघमारे, रोहण  बिलोणे, श्याम पवार या अंध विद्यार्थ्यांनी भूमिका सादर  केल्या. अंध असूनही त्यांचा रंगमंचावरील सहज वावर  डोळस कलावंतापेक्षाही सरस वाटला. विशेष म्हणजे  यातील एकाही कलावंताला त्यांच्या डॉयलॉगचे  प्रॉमटिंग करण्याची गरज भासली नाही. आज समाजात स्त्री-पुरुष समानतेच्या सुरस गप्पा  मारण्यात येतात. मात्र, प्रत्यक्षात कुठेतरी पुरुषांना झुकते  माप दिले जाते. या नाटकातील मिनलला मुख्याध्या िपकेच्या पदावर नियुक्ती दिली जाते. तिची ही नियुक्ती  होताच शाळेतील इतर पुरुष शिक्षकांचा अभिमान,  स्वाभिमान जागृत होतो. या नियुक्तीत भेदभाव झाल्याचा  आरोप मिनलवर करण्यात येतो. शेवटी न्याय निवाड्यासाठी प्रकरण कोर्टात दाखल हो ते. येथे आरोपीच्या पिंजर्‍यात उभी असलेली मिनल  कस्त्रया समाजात पुरुषांच्या बरोबरीने किंबहुना  त्यांच्याहीपेक्षा सरस कामे करीत आहेत. तरी त्यांच्या  कार्यक्षमतेवर उगाच शंका का घेतल्या जाते, याबाबत  न्यायमूर्तीसमोर आपले सडेतोड विचार व भावना मांडते.  अखेर मिनलचा विजय होऊन नाटिका संपते. तीस  मिनिटाच्या या नाटिकेत सर्वच कलावंतांनी नाटिकेस  साजेसे असे हलके फुलके विनोद करू न प्रेक्षकांना  रिझविले.