शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यातील मुलीचा अमरावतीत बालविवाह रोखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 10:11 IST

अमरावती महिला व बालकल्याण संरक्षण विभाग तसेच वलगाव पोलिसांनी गुरुवारी सकाळी धाव घेऊन हा बालविवाह रोखला.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोल्यातील शिवसेना वसाहतमधील रहिवासी असलेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह तिच्या मामाचे गाव असलेल्या अमरावती जिल्ह्यातील आष्टी येथे सुरू असतानाच अमरावती महिला व बालकल्याण संरक्षण विभाग तसेच वलगाव पोलिसांनी गुरुवारी सकाळी धाव घेऊन हा बालविवाह रोखला. तसेच दोन्ही परिवाराचे समुपदेशन करून हा विवाह मुलगी ८ महिन्यांनी १८ वर्षांची झाल्यानंतर करावा, अशा सूचना करून तसा कबुली जबाब घेण्यात आला.शिवसेना वसाहतमधील एका १७ वर्षीय मुलीचा साक्षगंध सोहळा ६ जुलै रोजी झाल्यानंतर तिचा विवाह सोहळा ९ जुलै रोजी वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भातकुली तालुक्यातील आष्टी येथील मुलासोबत होणार असल्याची माहिती अकोला बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी यांना मिळाली त्यांनी तत्काळ या संदर्भात अमरावती येथील जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय डबले यांना या संदर्भात लेखी पत्राद्वारे कळविले. डबले यांनी वलगाव पोलीस आणि चाइल्ड लाइन पथकाला सोबत घेऊन आष्टी येथे बाल विवाह सुरू असतानाच धडक दिली. सदर विवाहाचे संस्कार सुरू होण्यापूर्वीच तीनही पथक दाखल झाल्याने हा विवाह थांबविण्यात आला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी मुलीचे वय तपासले असता ती १८ वर्षाला ८ महिने कमी असल्याचे समोर आले. त्यामुळे बालविवाह प्रतिबंधक कायद्यासंदर्भात दोन्ही कुटुंबांचे समुपदेशन करून हा विवाह मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर करण्याच्या सूचना केल्या. सदर मुलगी १८ वर्षांची होण्यापूर्वी विवाह केल्यास दोन्ही कुटुंबीयावर गुन्हा दाखल करण्याचीही माहिती त्यांना दिली. त्यामुळे दोन्ही कुटुंबीयांना आता मुलगी १८ वर्षांची पूर्ण झाल्यानंतरच विवाह करणार असल्याचे संमतिपत्र त्यांना दिले. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हा बाल विवाह रोखण्यात आल्याची माहिती बाल कल्याण विभागाने दिली.

बालविवाह प्रतिबंधक कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. अमरावती जिल्ह्यासह कुठेही अशा प्रकारे बाल विवाह किंवा अत्याचार होत असेल तर त्याची माहिती बाल संरक्षण कक्षाला देण्यात यावी किंवा चाइल्ड व पोलिसांना माहिती दिल्यास तातडीने कारवाई करण्यात येईल.- अजय डबलेजिल्हा बाल संरक्षण अधिकारी, अमरावती

 

टॅग्स :AkolaअकोलाAmravatiअमरावती