शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
भारत-सीरिया राजकीय संबंधांच्या नव्या पर्वाला सुरुवात, भारताचा फायदा काय? समजून घ्या
4
भर रस्त्यात कारचं पार्किंग, स्टेअरिंगवर चक्क कुत्रा! अंधेरीच्या लोखंडवालामध्ये अजब प्रकार; व्हिडिओ व्हायरल...
5
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
6
Kamchatka Tsunami : जगाचा छोटासा कोपरा बनला भूकंपाचा अड्डा, एका झटक्यात 'या' १२ देशांना हादरवलं! त्सुनामीचा अलर्ट जारी
7
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
8
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
9
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
10
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
11
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
12
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
13
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
14
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
15
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
16
ITR भरल्यानंतर आता तासाभरात परतावा! आयकर विभागाचा स्पीड पाहून नागरिक थक्क, जाणून घ्या कसं झालं शक्य?
17
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
18
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
19
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
20
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न

केरळ पूरग्रस्तांसाठी चिखलगाव ग्रामस्थ, मोरगाव सादीजनचे विद्यार्थी सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 18:00 IST

अकोला : केरळ येथील पुरग्रस्तांसाठी मदत म्हणून अकोला तालुक्यातील चिखलगाव येथील ग्रामस्थांनी जमा केलेली ६ हजार ६८६ इतकी रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयातील मदत कक्षाच्या माध्यमातून आॅनलाईन जमा केली.

ठळक मुद्देओवाळणीची १५०० रुपये इतकी रक्कम शाळेच्या शिक्षकांनी मदत कक्षाच्या माध्यमातून आॅनलाईन जमा केली. याबाबतचे प्रमाणपत्र अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी शिक्षकांना दिले.

अकोला : केरळ येथील पुरग्रस्तांसाठी मदत म्हणून अकोला तालुक्यातील चिखलगाव येथील ग्रामस्थांनी जमा केलेली ६ हजार ६८६ इतकी रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयातील मदत कक्षाच्या माध्यमातून आॅनलाईन जमा केली. याबाबतचे पत्र ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांना दिले. तसेच, बाळापूर तालुक्यातील मोरगाव सादीजन येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनाची सामुहिकरित्या जमा केलेली ओवाळणीची १५०० रुपये इतकी रक्कम शाळेच्या शिक्षकांनी मदत कक्षाच्या माध्यमातून आॅनलाईन जमा केली. याबाबतचे प्रमाणपत्र अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी शिक्षकांना दिले. यावेळी गुणवत्ता शिक्षण विभागाचे प्रकाश अंधारे व जिल्हा हेल्प डेस्कचे प्रसाद रानडे उपस्थित होते.केरळ राज्यात अतिवृष्टीमुळे महाप्रलयकारी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे या राज्यातील पुरग्रस्तांना भरीव मदत करण्याकरीता अकोला जिल्हयातील नागरिकांनी व सर्वच घटकातील व्यक्तींनी सहृदयतेने यथाशक्य आर्थिक मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकजण मदतीसाठी पुढे येत आहे.दरम्यान, आर्थिक मदतीकरीता आॅनलाईन पैसे भरण्याची सुविधा केरळ शासनाने उपलब्ध करुन दिली आहे. ह्यमुख्यमंत्री आपत्ती निवारण निधीह्ण (सीएमडीआरएफ) या नावाने निधी पाठविता येणार आहे. सदर आॅनलाईन पध्दतीने पैसे भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील शैक्षणिक गुणवत्ता कक्ष येथे मदत कक्षाची स्थापना करण्यात आली असून या कक्षात हर्षदा काकड, प्रकाश अंधारे, प्रसाद रानडे, विशाल ढाकरगे, सचिन भांबेरे, संतोष इंगळे, हितेश राऊत, प्रसाद देशमुख यांचा समावेश आहे.सदर मदत निधी हा शंभर टक्के करमुक्त आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाKerala Floodsकेरळ पूरAastik Kumar Pandeyआस्तिककुमार पांडेय