शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री घेणार पाच जिल्ह्यांतील समस्यांचा आढावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 12:56 IST

अकोला : विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतील विविध समस्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार आहेत. त्यानुषंगाने विभागात प्रशासनामार्फत जिल्हानिहाय संबंधित मुद्यांची पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे.

ठळक मुद्देया बैठकीला प्रत्येक जिल्ह्यातील खासदार, आमदारांसह लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकाºयांसह विभागप्रमुख अधिकारी उपस्थित राहणार प्रशासनामार्फत जिल्हानिहाय संबंधित मुद्यांची पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे.

- संतोष येलकर

अकोला : विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतील विविध समस्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार आहेत. त्यानुषंगाने विभागात प्रशासनामार्फत जिल्हानिहाय संबंधित मुद्यांची पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे.विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यांत राबविण्यात येणाºया विविध योजनांची अंमलबजावणी, विकास कामांची सद्यस्थिती आणि विविध समस्या व अडचणींच्या मुद्यांवर मुख्यमंत्री जिल्हानिहाय आढावा बैठका घेणार आहेत. या बैठकीला प्रत्येक जिल्ह्यातील खासदार, आमदारांसह लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकाºयांसह विभागप्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री आढावा बैठक घेणार असल्याच्या पृष्ठभूमीवर विभागातील पाचही जिल्ह्यांत मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत चर्चिल्या जाणाºया विविध मुद्यांची पूर्वतयारी जिल्हा प्रशासनामार्फत सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये पालकमंत्री आणि जिल्हाधिकाºयांकडून आढावा बैठकांद्वारे संबंधित मुद्यांवर आढावा बैठका घेण्यात येत आहे.मुख्यमंत्र्यांकडून ‘या’ मुद्यांचा घेण्यात येणार आढावा!विधिमंडळाच्या नागपूर येथील अधिवेशनात मागील वर्षी आढावा बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाच्या इतिवृत्तांची जिल्हानिहाय अंमलबजावणी, मागेल त्याला शेततळे, धडक सिंचन विहीर योजनेंतर्गत कामांचे उद्दिष्ट व साध्य, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निवड करण्यात आलेल्या गावांमधील विकास कामांची सद्यस्थिती, कर्जमाफी योजनेंतर्गत कामाची प्रत्यक्ष स्थिती, महामार्ग रस्त्यांची स्थिती व दुरुस्ती आणि जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील रस्त्यांची स्थिती व दुरुस्तीची कामे, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत कामांची सद्यस्थिती, अपूर्ण जलसिंचन प्रकल्प आणि प्रस्तावित प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, कृषी पंपांसाठी पुरेसा वीज पुरवठा उपलब्ध करणे, शेतकरी आत्महत्या प्रकरणे, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलांची कामे, स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत कामांची सद्यस्थिती, विशेष प्रकल्पांतर्गत कामे इत्यादी मुद्यांसह विविध समस्या आणि अडचणींसंदर्भात जिल्हानिहाय आढावा मुख्यमंत्री घेणार आहेत.मुख्यमंत्र्यांच्या जिल्हानिहाय बैठकांचे असे आहे वेळापत्रक!मुख्यमंत्री जिल्हानिहाय आढावा बैठका घेणार आहेत. त्यामध्ये ११ डिसेंबर रोजी अमरावती, १२ डिसेंबर रोजी अकोला व वाशिम आणि १९ डिसेंबर रोजी बुलडाणा व यवतमाळ जिल्ह्याची आढावा बैठक मुख्यमंत्री घेणार आहेत. या सर्व आढावा बैठका दुपारी ३ वाजता नागपूर येथील मंत्रालयात मुख्यमंत्री घेणार आहेत. लोकप्रतिनिधींसह संबंधित अधिकारी या बैठकांना उपस्थित राहणार आहेत.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसGovernmentसरकारAkola cityअकोला शहर