अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील ८३ कनिष्ठ व वरिष्ठ संशोधन सहायकांना बडतर्फ करण्यात आले आहे. प्रशासनाच्या चुकीमुळे कर्मचार्यांवर हे संकट ओढविले असून त्यांची सेवा पुन्हा बहाल करण्यात यावी, अशी मागणी या कर्मचार्यांच्या प्रतिनिधींनी आ. गोवर्धन शर्मा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी कृषी विद्यापीठाकडे अहवाल मागितला असून, लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.कृषी विद्यापीठात १0 वर्षे सेवा देणार्या कर्मचार्यांना बडतर्फ करण्यात आले. केवळ प्रशासनाच्या चुकीमुळे हा प्रसंग ओढविला असल्याची कैफियत कर्मचार्यांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री फडणवीस आणि कृषिमंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे मांडली. मुख्यमंत्र्यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे याबाबत विचारणा करून तात्काळ संपूर्ण माहितीसह अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. यावेळी कृषी विद्यापीठातील प्रकल्पग्रस्तांचा प्रश्नही आ. शर्मा यांनी मुख्यमंत्र्यांपुढे मांडला.
कृषी विद्यापीठातील बडतर्फ कर्मचा-यांची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
By admin | Updated: November 12, 2014 01:03 IST