शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींच्या रोहयो कामाचे धनादेश ‘बाउन्स’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 13:21 IST

अकोला : एकीकडे ग्रामपंचायतींच्या खात्यातून सर्व रक्कम काढून घेतल्यानंतर त्याच ग्रामपंचायतींनी कामाच्या देयकापोटी अदा केलेले धनादेश पंचायत समिती स्तरावर परत आल्याने (‘बाउन्स’) रोजगार हमी योजना विभागावर नामुश्की ओढवली आहे.

अकोला : एकीकडे ग्रामपंचायतींच्या खात्यातून सर्व रक्कम काढून घेतल्यानंतर त्याच ग्रामपंचायतींनी कामाच्या देयकापोटी अदा केलेले धनादेश पंचायत समिती स्तरावर परत आल्याने (‘बाउन्स’) रोजगार हमी योजना विभागावर नामुश्की ओढवली आहे. या प्रकाराची तातडीने चौकशी करून कारवाई करण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अकोला पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिला आहे.अकोला तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींमध्ये महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेंतर्गत ३१ मार्च २०१८ रोजी निधी अखर्चित होता. त्या निधीतून देय रकमेचे धनादेश ग्रामपंचायतींनी सादर केले. ते निधीअभावी परत करण्यात आले. हा प्रकार तालुक्यातील सिसा, मजलापूर, माझोड, घुसर व कोळंबी या ग्रामपंचायतींसंदर्भात घडला आहे. या प्रकाराची चौकशी करून तसा अहवाल तातडीने सादर करण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी १६ मे रोजी दिला आहे.मस्टर सादर झाल्याच्या १४ दिवसांत मजुरी अदा न केल्यास त्याची जबाबदारी निश्चित करून संबंधितांकडून दंड वसूल करण्याचीही तरतूद आहे. तरी शासनाने ३४ जिल्ह्यांत योजनेच्या कामासाठी लागणाºया साहित्याच्या मोबदल्यापोटी देय असलेला २९७ कोटी ७७ लाखांपेक्षाही अधिक निधी आॅक्टोबर २०१७ पासून थकीत आहे. त्यामध्ये मे २०१९ अखेरपर्यंत वाढच झालेली आहे. त्याचवेळी गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील रोजगार हमी योजनेच्या कामांसाठी निधी न दिल्याने २८७ कोटींपेक्षाही अधिक रक्कम थकीत असताना ग्रामपंचायतींच्या खात्यात असलेला निधी शासनजमा करून घेण्यात आला.- गटविकास अधिकारी, लेखाधिकाºयांना पत्रनिधीअभावी धनादेश परत येण्याबाबतची वस्तुस्थिती शोधण्यासाठी अकोला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राहुल शेळके यांच्यासह सहायक लेखाधिकारी जगदीश बेंद्रे, कनिष्ठ लेखाधिकारी रवी मानकर यांना पत्र देण्यात आले.- निधी न देताच ग्रामपंचायतींकडून वसुलीग्रामपंचायतींच्या खात्यावर निधी देण्याऐवजी त्यामध्ये शिल्लक असलेली रक्कमही शासनजमा करण्याचा आदेश राज्यातील सर्वच ग्रामपंचायतींना देण्यात आला. त्यानुसार सर्वच जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी हा मुद्दा प्राधान्याचा ठरवून रक्कम वसुलीची जबाबदारी गटविकास अधिकाºयांवर टाकली. मासिक आढावा सभेत ग्रामसेवकांना ही रक्कम धनादेशाद्वारे जमा करण्याचे बजावण्यात आले.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद