शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

मुदतबाह्य सॅनिटायजरची स्टिकर बदलून विक्री सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 11:17 IST

मुदतबाह्य हॅण्ड सॅनिटायजरच्या स्टिकरवर नवीन मुदतीचे स्टिकर लावून त्याची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे.

ठळक मुद्देऔषध व्यावसायिकांनी आता सॅनिटायजरच्या माध्यमातून मोठी दुकानदारी सुरू केली आहे.अन्न व औषध प्रशासन विभागाकडून अद्यापही ठोस कारवाई नाही. सुरू केलेला हा प्रकार त्यांच्याच अंगाशी येण्याची शक्यता आहे.

- सचिन राऊत लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मुदतबाह्य हॅण्ड सॅनिटायजरच्या स्टिकरवर नवीन स्टिकर लावून त्याची चढ्या दराने विक्री करण्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर सर्वोपचार रुग्णालयासमोरील औषध व्यावसायिकांकडून हॅण्ड सॅनिटायजरच्या स्टिकरवर नवीन स्टिकर लावून खुलेआम विक्री करण्यात येत असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे; मात्र अन्न व औषध प्रशासन विभागाकडून अद्यापही ठोस कारवाई होत नसल्याने त्यांच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चीनमध्ये धुमाकूळ घातलेल्या कोरोना आजाराचे १७ पेक्षा अधिक पॉझिटिव्ह रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. विदर्भातील नागपुरात ३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने कोरोनाचे संकट आता जवळ आले आहे. अकोल्यातही एका मुलीला कोरोना संशयित घोषित करताच तसेच विदेशातून आलेल्यांवर उपचार सुरू असल्याने या आजाराची दहशत पसरली आहे. त्यामुळे उपाययोजना करण्यासाठी नागरिक प्रचंड जागरूक झाले असतानाच सॅनिटायजरची खरेदी करण्यात येत आहे. औषध व्यावसायिकांनी याचाच गैरफायदा घेत मुदतबाह्य हॅण्ड सॅनिटायजरच्या स्टिकरवर नवीन मुदतीचे स्टिकर लावून त्याची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे. औषध व्यावसायिकांनी अकोलेकरांच्या डोळ्यात धूळफेकच सुरू केली असून, याचे लोण त्यांच्यापर्यंत पोहोचल्यास त्यांनी सुरू केलेला हा प्रकार त्यांच्याच अंगाशी येण्याची शक्यता आहे.

कोरोनाचा धसका अन् दुकानदारीकोरोना या गंभीर आजाराचे पॉझिटिव्ह रुग्ण महाराष्ट्रात वाढत असतानाच सेवाभाव विसरलेल्या औषध व्यावसायिकांनी आता सॅनिटायजरच्या माध्यमातून मोठी दुकानदारी सुरू केली आहे. हॅण्ड सॅनिटायजरचे स्टिकर बदलून त्याची खुलेआम विक्री करून औषध व्यावसायिकांनी दुकानदारीच थाटली आहे.

बनावट सॅनिटायजर बाजारातबनावट सॅनिटायजर बाजारात दाखल झाले असून, यावरही नजर ठेवण्याची जबाबदारी आता अन्न व औषध प्रशासन विभागाची राहणार आहे. मुंबईमध्ये १० ते १२ ठिकाणी छापे टाकून बनावट सॅनिटायजर जप्त करण्यात आले आहे. हेच हॅण्ड सॅनिटायजर आता अकोल्यातही विक्री होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाने आतातरी यावर अंकुश लावण्याची मागणी होत आहे.

विनादेयकाचा गैरफायदासॅनिटायजरची खरेदी करताना देयक घेण्यात येत नसल्याने त्याचाच गैरफायदा घेऊन मुदतबाह्य सॅनिटायजरचे स्टिकर बदलून विक्री सुरू आहे. शुक्रवारी सर्वोपचार रुग्णालयासमोरील एका औषध व्यावसायिकाकडून या सॅनिटायजरची खुलेआम विक्री करण्यात येत होती. याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला देण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

टॅग्स :corona virusकोरोनाAkolaअकोलाFDAएफडीए