शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पोस्ट आॅफिसमधील बंद आधार केंद्रांची चाचपणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 14:38 IST

प्रत्येक आधार केंद्रातून किती आधार अपडेट झाले आणि नवीन आधार किती तयार झाले, याची माहिती घेतली जात आहे.

अकोला : शहरातील बहुतांश पोस्ट आॅफिसमधील आधार केंद्र बंद, असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशझोतात आणताच बंद आधार केंद्रांची चाचपणी सुरू झाली आहे. प्रत्येक आधार केंद्रातून किती आधार अपडेट झाले आणि नवीन आधार किती तयार झाले, याची माहिती घेतली जात आहे. ‘लोकमत’च्या वृत्तामुळे अकोल्यातील पोस्ट विभागातील अधिकाऱ्यांना जाग आली आहे. सातत्याने आधार केंद्र बंद असल्याची तक्रार वरिष्ठांपर्यंत पोहोचली आहे.अकोला शहर परिसरात असलेल्या पोस्ट आॅफिसमधील बहुतांश आधार केंद्र बंद असल्याने नागरिकांची प्रचंड कोंडी होत आहे; मात्र सर्वसामान्य माणसांच्या या समस्येकडे लक्ष देण्यास प्रवर डाक अधीक्षकांना वेळ नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले. शहरातील शिवाजी पार्क, जुने शहर, ताजनापेठ, जठारपेठ, कृषी नगर, गांधी नगर येथील पोस्ट आॅफिसमधील आधार केंद्र सेवा गत काही महिन्यांपासून अघोषितपणे बंद असतानादेखील वरिष्ठांकडून साधी दखल घेतल्या गेली नाही. ही बाब ‘लोकमत’ने अधोरेखित केल्यामुळे प्रवर डाक अधीक्षक यांनी जिल्ह्यातील सर्व आधार के ंद्रांतील अलीकडचा डेटा मागविला. त्यात वस्तुस्थिती ‘लोकमत’ने सांगितल्याप्रमाणे समोर आली. आता त्यावर काय उपाययोजना होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. पोस्ट आॅफिसमधील आधार केंद्र बंद असल्याने अनेक अकोलेकरांचे आधार अपडेट आणि नवीन आधार कार्ड तयार करणे कठीण झाले आहे. 

टॅग्स :AkolaअकोलाAdhar Cardआधार कार्ड