शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

प्लॉट विक्रीच्या नावाखाली महिलेस साडे सहा लाखांनी गंडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2022 20:16 IST

Crime News : ६ लाख ५९ हजार हडपले असल्याची तक्रार सिताबाई नाईक यांनी २५ जानेवारी रोजी आर्थिक गुन्हे शाखेकडे केली होती.

ठळक मुद्देमूर्तिजापूर येथील प्रकार गुन्हा दाखल; आरोपी मोकाटच 

मूर्तिजापूर :  रेल्वेतून सेवा निवृत्त झालेल्या महिलेकडून प्लॉट विक्रीच्या नावाखाली वेळोवेळी पैसे घेऊन आतापर्यंत ६ लाख ५९ हजाराचा गंडा घातल्याचे प्रकरण समोर आले आहे. गिताबाई नाईक यांनी पोलीसात २५ जानेवारी रोजी दाखल केलेल्या तक्रारीवरून मूर्तिजापूर येथील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तथापी, आतापर्यंत अटक करण्यात आलेली नाही.          शहरात जया वाकोडे नामक महिलेचे प्लॉट असून ते विक्री आहेत व प्लॉट खरेदी करण्यासाठी तुम्ही इसार पावती करा त्यासाठी जया डिगांबर वाकोडे व सतिश दज्जूका यांनी रेल्वेत सफाई कामगार म्हणून निवृत्त झालेल्या सिताबाई नाईक यांना वेळोवेळी पैशाची मागणी करुन त्यांच्या कडून आतापर्यंत ६ लाख ५९ हजार हडपले असल्याची तक्रार सिताबाई नाईक यांनी २५ जानेवारी रोजी आर्थिक गुन्हे शाखेकडे केली होती. सदर प्रकरण मूर्तिजापूर शहर पोलीसांकडे वर्ग करण्यात आले. परंतु गत ५ दिवसांपासून आरोपीस अटक करण्यात आली नाही.

उपरोक्त आरोपींनी त्यांच्या मालकीचे प्लॉट नसताना खोटे शेत सर्वे नंबर व प्लॉट नंबर देऊन इसार पावती करुन घेतली व सदर प्लॉट खरेदी करुन देतो असे सांगितले परंतु गत सात महिन्यांपासून उपरोक्त आरोपी भूलथापा देत आहेत. माहिती काढली असता त्यांच्या नावे कुठलेही प्लॉट नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे माझी फसवणूक झाली असल्याचे सिताबाई नाईक यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. सदर तक्रारीवरून सतिश प्रभूदयाल दज्जूका व जया डिगांबर वाकोडे यांच्या विरुद्ध शहर पोलीसांत ४२० कलमासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल आहे.