सस्ती जिल्हा परिषद सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य संदीप तुकाराम सरदार यांना अश्लील व जातीवाचक शिवीगाळ करून पाच जणांनी मारहाण केली. त्यांच्या तक्रारीनुसार चान्नी पोलिसांनी आरोपी शिवाजी काळे, गौरव काळे, पंढरी गडदे, संतोष काळे, आतिष काळे, यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल केला. तसेच दुसऱ्या गटातील दोन आरोपींनी घरात घुसून महिलेचा हात पकडून विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला. महिलेच्या फिर्यादीनुसार जिल्हा परिषद सदस्य संदीप तुकाराम सरदार व प्रमोद मधुकर पवार यांच्याविरुद्ध विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल केला. रात्री उशिरापर्यंत आरोपींना अटक करण्याची प्रक्रिया सुरू होती. ॲट्रॉसिटी ॲक्टचा पुढील तपास बाळापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी व चान्नी पोलिस करीत आहेत. राजकीय हेव्यादाव्यातून दोन गटात वाद होऊन ही घटना घडल्याची चर्चा परिसरात आहे.
सस्ती जिल्हा परिषद सदस्य सरदार यांना मारहाण, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:20 IST