शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

पातूर तालुक्यकातील चतारी, सस्ती परिसरात बिबट्याची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 20:11 IST

वाडेगाव : पातूर तालुक्यातील चतारी आणि सस्ती परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी युवा सेनेच्यावतीने वन विभागाला दिलेल्या निवेदनात केली आहे.  

ठळक मुद्देयुवा सेनेचे वन विभागाच्या अधिकार्‍यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवाडेगाव : पातूर तालुक्यातील चतारी आणि सस्ती परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी युवा सेनेच्यावतीने वन विभागाला दिलेल्या निवेदनात केली आहे.  चतारी परिसरामध्ये गेल्या २0 ते २५ दिवसांपासून बिबट्याने दहशत निर्माण केली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे परिसरामध्ये शेतकरी, शेतमजूर, शेती कामासासाठी जाण्यास घाबरत आहेत. सध्या परिसरामध्ये खरीप रब्बी हंगामाची कामे सुरू आहेत.कापूस वेचणी, सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरी, कडधान्य यांची काढण्याची कामे सुरू आहेत. बहुतेक शेतकरी रात्रीच्या वेळेस शेतात थांबून असतात. अनेकांचे गाय, म्हशी, शेळी, मेंढीपालन शेतात आहे. त्यामुळे वन विभागाने शोधमोहीम राबवून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी युवा सेनेने निवेदनात केली आहे. या निवेदनावर वन विभाग अधिकारी एच. आर. राठोड, एम.एस. राठोड, ए. एस. आडे यांनी बिबट्याला लवकरच जेरबंद करू, अशी ग्वाही दिली. यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ईश्‍वर सौंदळे, अमर लखाडे, सुमित भालतिलक, मंगेश मुळे, श्याम राखोंडे, प्रशांत उगले, सचिन बनिये, आशिष महाले, ईश्‍वर तराळे, संतोष इंगळे, अमोल ढोरे, शरद वाडेकर, ज्ञानेश्‍वर डिवरे, योगेश ढोरे, मंगेश बंड, दीपक पुरी, यशवंतराव सरदार, दिनेश मांजरे, पुरुषोत्तम मुंडे आदींनी निवेदन दिले. 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणleopardबिबट्या