शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पळून गेलेल्या मुलांचा २४ तासांत छडा

By admin | Updated: January 29, 2017 02:13 IST

घरून पळून जाणा-या मुलांचा शोध लावल्याचे तिसरे प्रकरण.

अकोला, दि. २८- महात्मा फुले नगर येथून घरून पळून गेलेल्या दोन मुलांचा शोध खदान पोलिसांनी २४ तासांच्या आत लावला. खदानचे ठाणेदार गजानन शेळके यांनी जबाबदारी स्वीकारल्यानंतर घरून पळून जाणार्‍या मुलांचा शोध लावल्याचे हे तिसरे प्रकरण आहे.रूपा सुरेश प्रधान यांचा मुलगा यश सुरेश प्रधान (११) आणि राहुल संतोष भालेराव हे दोघे २७ जानेवारी रोजी सकाळी घरून शाळेत गेली होती. शाळा सुटल्यानंतर ती परत न आल्याने दोन्ही मुलांच्या आई-वडिलांनी त्यांचा शोध सुरू केला. दोघांच्याही शाळेत पाहणी केली असता, ते शाळेतून गेल्याचे सांगण्यात आले, तर नातेवाइकांकडे शोधल्यावरही दोन्ही मुलांचा शोध लागला नाही. त्यामुळे रूपा प्रधान यांनी खदान पोलीस स्टेशनमध्ये मुलांना पळवून नेल्याची तक्रार दिली. यावरून खदान पोलिसांनी शनिवारी दुपारी भारतीय दंड विधानाच्या कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल करून मुलांचा शोध सुरू केला. कौलखेड परिसरात सुरू असलेल्या एका आनंद मेलापासून ते निमवाडी बसस्थानक, रेल्वे स्टेशन, शहरातील मंदिर, मशीद, बुद्ध विहार या ठिकाणांवर दोन्ही मुलांचा शोध घेण्यात आला; मात्र त्यांचा पत्ता लागला नाही. बराच शोध घेतल्यावरही शोध लागत नसल्याने खदानचे ठाणेदार गजानन शेळके यांनी सोशल मीडियाचा आधार घेत दोन्ही मुलांचे फोटो त्यावर अपलोड करून नागरिकांना आवाहन केले. त्यानंतर खदान पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी आणि आणखी दोन शोध पथके तातडीने कार्यान्वित करण्यात आली. या पथकांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर या दोन्ही मुलांचा शोध शहरातीलच वाकापूर परिसरात लावण्यात खदान पोलिसांना यश आले. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार गजानन शेळके, बाळासाहेब नाईक व जगदीश इंगळे यांनी केली.