शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

श्रीसूर्या घोटाळ्यातील मुख्य आरोपींवर आरोप निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 14:10 IST

समीर जोशी, त्याची पत्नी पल्लवी व एजंटवर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: गुंतवणुकीच्या नावाखाली शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणारा श्रीसूर्या कंपनीचा संचालक समीर जोशी आणि त्याची पत्नी पल्लवी जोशी या दोघांवर जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. के. शर्मा यांच्या न्यायालयात गुरुवारी दोषारोप निश्चित करण्यात आले. यावेळी सदर दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते.श्रीसूर्या इन्व्हेस्टमेंट कंपनीचा संचालक समीर जोशी व त्याची पत्नी पल्लवी जोशी यांनी अकोल्यासह राज्यातील अनेक शहरांमधील गुंतवणूकदारांना कंपनीच्या विविध आकर्षक योजनांचे आमिष दाखवून त्यांची कोट्यवधी रुपयांची रक्कम गुंतवणूक केली होती. गुंतवणूक केलेल्या रकमेवर दामदुप्पट व भरघोस व्याज देण्याचे आमिष दाखवून राज्यातील नागरिकांना कोट्यवधी रुपयांनी गंडविले आहे. याप्रकरणी समीर जोशी, त्याची पत्नी पल्लवी व एजंटवर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.याच फसवणूक प्रकरणात रामदासपेठ पोलीस ठाणे आणि खदान पोलीस ठाण्यातही या दोघांसह आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यानंतर पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले. त्यानंतर समीर व पल्लवी जोशी या दोघांवरच गुरुवारी आरोप निश्चिती करण्यात आली असून, इतर सहा आरोपी मात्र या प्रक्रियेपासून दूरच आहेत. खदान व रामदासपेठ पोलिसांनी सदर सहा आरोपींवरील दोषारोपपत्रच न्यायालयात दाखल केले नसल्याने त्यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले नसल्याची माहिती आहे. दरम्यान, गुरुवारी या दोन आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले आहे. या दोन्ही आरोपींच्यावतीने अ‍ॅड. आशिष देशमुख यांनी कामकाज पाहिले.या सहा आरोपींचे दोषारोपपत्रच नाही!मधुकर ददगाळ यांच्या तक्रारीवरून समीर सुधीर जोशी, पल्लवी समीर जोशी यांच्यासह त्याचे अकोल्यातील एजंट मोहन मुकुंद पितळे, मंगेशी मोहन पितळे, मुकुंद पितळे, शंतनू कुºहेकर, चंद्रशेखर कुºहेकर आणि आनंद जहागीरदार या आठ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामधील समीर आणि पल्लवी या दोघांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे; मात्र रामदासपेठ आणि खदान पोलिसांनी इतर सहा आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखलच केले नसल्याची माहिती आहे. त्यामुळे त्यांच्यावरील आरोप निश्चिती अद्यापही बाकी असल्याची माहिती आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी