शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शुल्काचे दरपत्रक लावा, अन्यथा कारवाई !

By admin | Updated: May 26, 2017 02:57 IST

महा ई-सेवा केंद्रांना ‘एसडीओं’नी बजावली नोटिस

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विविध दाखले आणि प्रमाणत्रांसाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्कात नागरिकांची लूट होऊ नये, यासाठी दाखले व प्रमाणपत्रांसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्काचे दरपत्रक आणि आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी दर्शनी भागात लावण्यात यावी, अन्यथा कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा अकोल्याचे उपविभागीय (एसडीओ) ओमप्रकाश अग्रवाल यांनी गुरुवारी तालुक्यातील महा ई-सेवा केंद्रांना बजावलेल्या नोटिसद्वारे दिला आहे.तहसील व उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर दाखला, प्रतिज्ञालेख, वय, अधिवास व उत्पन्नाचे दाखले दिल्या जातात. विविध दाखले आणि प्रमाणपत्रांसाठी महा ई-सेवा केंद्रांमार्फत नागरिकांकडून अर्ज स्वीकारण्यात येतात. दाखले व प्रमाणपत्रांसाठी अर्ज स्वीकारताना महा ई-सेवा केंद्रांकडून शुल्कापोटी वेगवेगळे दर आकारले जातात. त्यामुळे दाखले व प्रमाणपत्रांसाठी शुल्काचे वेगवेगळे दर आकारून नागरिकांची लूट होऊ नये, यासाठी प्रमाणपत्र व दाखल्यांसाठी नियमानुसार आकारण्यात येणाऱ्या शुल्काचे दरपत्रक आणि दाखले व प्रमाणपत्रांसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी महा ई-सेवा केंद्रांच्या दर्शनी भागात ३१ मेपर्यंत लावण्यात यावी, अन्यथा कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा अकोल्याचे उपविभागीय अधिकारी ओमप्रकाश अग्रवाल यांनी अकोला तालुक्यातील महा ई-सेवा केंद्रांच्या संचालकांना बजावलेल्या नोटिसमध्ये दिला आहे.दाखले आणि प्रमाणपत्रांसाठी शुल्काचे दरपत्रक आणि आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी ३१ मेपर्यंत महा ई-सेवा केंद्रांच्या दर्शनी भागात लावण्यात यावी, अन्यथा कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भात तालुक्यातील महा ई-सेवा केंद्र संचालकांना नोटिस बजावण्यात आली आहे.-ओमप्रकाश अग्रवाल,उपविभागीय अधिकारी, अकोला.