अकोला : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता अकोला-काचीगुडा-अकोला विशेष एक्स्प्रेस आणि काचीगुडा-नरखेड-काचीगुडा विशेष एक्स्प्रेस १४ व १८ जानेवारीपासून पुन्हा सुरु करण्यात येत आहेत. यातील आठवड्यातून सहा दिवस धावणारी गाडी क्रमांक ०७६४१ काचीगुडा ते नरखेड विशेष एक्स्प्रेसच्या अकोला येथील वेळेत बदल करण्यात आला आहे. पूर्वी घोषित केल्यानुसार ही गाडी अकोला येथून वाजता सायंकाळी ०६.२० वाजता सुटणार होती , परंतु यात बदल करण्यात आला असून आता ही गाडी १४ जानेवारी, २०२१ पासून अकोला रेल्वे स्थानकावरून सायंकाळी ०६.२० वाजता सुटेल. तसेच गाडी क्रमांक ०७६४२ नरखेड ते काचीगुडा ही विशेष गाडी पूर्वी घोषित केल्यानुसार अकोला रेल्वे स्थानकावरून सकाळी ०९.२० वाजता सुटणार होती ती आता दिनांक १५ जानेवारी पासून पाच मिनिटे अगोदर म्हणजे ०९.१५ मिनिटांनी सुटणार आहे.
काचीगुडा-नरखेड विशेष रेल्वेच्या अकोला येथील वेळेत बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 19:18 IST