शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

विकासकामांचा निधी खर्चाचे आव्हान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 14:57 IST

‘मार्च एन्डिंग’ला केवळ दोन महिन्यांचा कालावधी उरला असल्याने, या कालावधीत विकासकामांचा ११२ कोटी रुपयांचा निधी करण्याचे आव्हान यंत्रणांपुढे निर्माण झाले आहे.

- संतोष येलकर

अकोला : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी १५९ कोटी रुपयांचा निधी मंजूर असला तरी, त्यापैकी डिसेंबर अखेरपर्यंत केवळ ४६ कोटी ९५ लाख ७१ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. ‘मार्च एन्डिंग’ला केवळ दोन महिन्यांचा कालावधी उरला असल्याने, या कालावधीत विकासकामांचा ११२ कोटी रुपयांचा निधी करण्याचे आव्हान यंत्रणांपुढे निर्माण झाले आहे.जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना अंतर्गत २०१९-२० या आर्थिक वर्षात जिल्ह्यात कृषी, पशुसंवर्धन, नगरोत्थान, आरोग्य, शिक्षण, पाटबंधारे, महिला व बालकल्याण आदी क्षेत्रातील विविध विकास कामांसाठी १५९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी ९५ कोटी ४० लाख रुपयांचा निधी शासनामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन विभागाला प्राप्त झाला. उपलब्ध निधीपैकी यंत्रणांच्या मागणीनुसार ६० कोटी ८९ लाख ६४ हजार रुपयांचा निधी विकासकामांसाठी वितरित करण्यात आला. वितरित करण्यात आलेल्या निधीपैकी डिसेंबर अखेरपर्यंत ४६ कोटी ९५ लाख ७१ हजार रुपयांचा निधी यंत्रणांमार्फत विकासकामांवर खर्च करण्यात आला आहे. ‘मार्च एन्डिंग’ला केवळ दोन महिन्यांचा कालावधी उरला आहे. त्यामुळे दोन महिन्यांच्या कालावधीत जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मंजूर निधीपैकी ११२ कोटी रुपयांचा निधी खर्च करणे आणि विकासकामे मार्गी लावण्याचे आव्हान जिल्ह्यातील संबंधित यंत्रणांसमोर निर्माण झाले आहे.६३.६० कोटींचा निधी शासनाकडून केव्हा मिळणार?जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत जिल्ह्यातील विकासकामांसाठी चालू आर्थिक वर्षात १५९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे; मात्र मंजूर निधीपैकी डिसेंबर अखेरपर्यंत ९५ कोटी ४० लाख रुपयांचा निधी (६० टक्के) शासनाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन विभागाला प्राप्त झाला आहे. उर्वरित ६३ कोटी ६० लाख रुपयांचा निधी अद्याप शासनाकडून प्राप्त झाला नाही. त्यामुळे प्रलंबित निधी शासनाकडून केव्हा मिळणार, याबाबत प्रतीक्षा केली जात आहे.९७ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता!जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत यंत्रणांकडून प्राप्त प्रस्तावानुसार ९७ कोटी ५६ लाख रुपयांच्या विकासकामांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत यंत्रणांच्या मागणीनुसार डिसेंबर अखेरपर्यंत ६० कोटी ८९ लाख ६४ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असून, त्यापैकी ४६ कोटी ९५ लाख ७१ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. विकासकामांचा मंजूर निधी मार्च अखेरपर्यंत खर्च करण्याच्या सूचना यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.- ज्ञानेश्वर आंबेकरजिल्हा नियोजन अधिकारी

 

टॅग्स :Akolaअकोला