शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपसमोर बालेकिल्ला, विरोधकांसमोर अस्तित्व टिकविण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 13:56 IST

भाजप समोर हा बालेकिल्ला कायम ठेवण्याचे तर काँग्रेस समोर पक्षाचे अस्तित्वच टिकविण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

- आशिष गावंडेलोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अकोला पश्चिम हा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला आहे. तर या मतदार संघात काँग्रेस ला २५ वर्षांपासून यश मिळाले नाही. त्यामुळे यावेळी भाजप समोर हा बालेकिल्ला कायम ठेवण्याचे तर काँग्रेस समोर पक्षाचे अस्तित्वच टिकविण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.भारतीय जनता पार्टीने अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार गोवर्धन शर्मा यांना तब्बल सहाव्यांदा उमेदवारी बहाल केली आहे. तर काँग्रेसचा आक्रमक चेहरा अशी ओळख असलेल्या साजिद खान पठाण निवडणूक रिंगणात दंड थोपटून उभे आहेत. दुसरीकडे काँग्रेसला ‘लक्ष्य’करणाऱ्या अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी थेट काँग्रेसचे प्रदेश महासचिव तथा माजी महापौर मदन भरगड यांना गळाला लावत त्यांना वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरवले.२०१४ मधील निवडणुकीचा अपवाद वगळता या मतदारसंघातून भाजप-सेना युतीचेच उमेदवार म्हणूनच आ. गोवर्धन शर्मा निवडणुकीला सामोरे गेले आहेत. या मतदारसंघात त्रिशंकू लढाई पाहावयास मिळणार असून, भाजप-शिवसेना महायुतीसमोर काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीचा कितपत टिकाव लागतो, हे लवकरच दिसून येणार आहे.

युती ।मजबूत नेटवर्क, शिस्तबद्ध यंत्रणाया मतदारसंघात भाजप व शिवसेनेचे नेटवर्क मजबूत मानल्या जाते. हिंदुत्वाच्या मुद्यावर लढविल्या जाणारी निवडणूक भाजपच्या पथ्यावर पडली आहे.आघाडी । आघाडीमुळे मतविभाजन टळेल!काँग्रेसचा परंपरागत मतदार काँग्रेसशी एकनिष्ठ आहे. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाल्यामुळे भाजपला कडवी टक्कर दिली जाऊ शकते.

वंचित । प्रयोगाची उत्सुकतावंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सर्व जातीसमूहातील घटकांना एकत्र आणण्याचा प्रयोग करीत उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना मानणारा वर्ग उमेदवाराच्या पाठीशी दिसून येतो. 

टॅग्स :AkolaअकोलाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019