शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेला १६ कोटी खर्च करण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 13:38 IST

अकोला: जिल्हा परिषदेला गेल्या दोन वर्षांपासून रस्ते निर्मिती, दुरुस्तीच्या कामासाठी शासनाकडून मिळालेले ७ कोटी ४४ लाख रुपये ३१ मार्च २०१९ पर्यंत खर्च करण्याची कसरत जिल्हा परिषद पदाधिकारी, विभागाला झेपते की नाही, यावर जिल्ह्यातील ग्रामीण, इतर जिल्हा रस्त्यांचा विकास अवलंबून आहे

अकोला: जिल्हा परिषदेला गेल्या दोन वर्षांपासून रस्ते निर्मिती, दुरुस्तीच्या कामासाठी शासनाकडून मिळालेले ७ कोटी ४४ लाख रुपये ३१ मार्च २०१९ पर्यंत खर्च करण्याची कसरत जिल्हा परिषद पदाधिकारी, विभागाला झेपते की नाही, यावर जिल्ह्यातील ग्रामीण, इतर जिल्हा रस्त्यांचा विकास अवलंबून आहे. त्यासोबतच जिल्हा परिषद उपकराचे (सेस) ९ कोटी १७ लाखही अखर्चित असल्याने सत्ताधाऱ्यांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.शासनाकडून विविध विकास कामांसाठी निधी देताना तो खर्च करण्याची मुदतही ठरवून दिली जाते. जिल्हा परिषदेला २०१६-१७ मध्ये प्राप्त निधी खर्च करण्याची मुदत ३१ मार्च २०१८ रोजी संपुष्टात आली. या मुदतीनंतर अखर्चित निधी ३० जून २०१८ पर्यंत शासनजमा करावाच लागतो. त्यासाठी मुख्य लेखा व वित्त अधिकारी कार्यालयाने या मुदतीत खर्च न झालेला निधी शासनजमा करण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला २०१६-१७ मध्ये प्राप्त निधीचा आढावा घेण्यात आला. त्यातून मोठ्या प्रमाणात निधी अखर्चित असल्याचे पुढे आले. तो निधी परत घेण्यात आला. सोबतच २०१७-१८ मध्ये प्राप्त निधी खर्च करण्याला ३१ मार्च २०१९ पर्यंतची मुदत आहे. तो निधीही अद्यापपर्यंत अखर्चित आहे. या मुदतीत अखर्चित असलेला निधी ७ कोटी ४४ लाख रुपयांपेक्षाही अधिक आहे.- सेसफंडाचे कागदी घोडेजिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त निधीशिवाय जिल्हा परिषद उपकर(सेस) निधीही अखर्चित आहे. सेसचे ९ कोटी १७ लाख रुपये ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत अखर्चित ठेवण्यात आले. हा निधी खर्चाचे नियोजन कागदावर आहे. तो खर्च करण्याची केवळ चर्चा सुरू आहे. येत्या काळातील निवडणूक प्रक्रिया पाहता हा निधीही खर्च होतो की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती.- कामाची टक्केवारीही वसूलविशेष म्हणजे, सेसफंडातील काम देण्यासाठी काही कंत्राटदारांनी संबंधित काही पदाधिकाºयांना आधीच टक्केवारी देऊन ठेवल्याची माहिती आहे; मात्र आता नियोजनच होत नसल्याने रक्कम मागावी कुणाला, या विवंचनेत अनेकांनी पुढील काळासाठी गुंतवणूक म्हणून त्या रकमेला ठेवले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद